अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीचे ५ वर्ष लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात घडली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (वय 38) असे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील पीडीत मुलगी ही आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरु होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.
Solapur Crime: नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी गरोदर
या सगळ्याला पीडितेने विरोध केला असता. आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’, अशी भीती त्याने दाखवली. कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी पीडितेने हा छळ सहन केला. घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली.
पुन्हा भीतीपोटी पीडित त्याच्या घरी गेला असता, तू लवकर का आली नाहीस, असे विचारात आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितलं तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
या मारहाणीमुळे आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही काठी झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने घडलेली घटना सांगितली. त्यांनतर भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. त्यामुळे आता पोलीस चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात ही धक्कादायक घटना घडली.
Ans: कीर्तनकार आणि श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ.
Ans: पीडित मुलगी आठवीत असल्यापासून सुमारे पाच वर्षे आरोपीकडून तिच्यावर वारंवार अत्याचार होत होते.






