Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पत्नी कल्पना खरात हिला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित फसवणूक प्रकरणात सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर तिला दिलासा दिला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 11:52 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर.
  • 2004 मधील जमीन व्यवहारावर 2026 मध्ये गुन्हा दाखल.
  • न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले.
नाशिक: नाशिकमधील चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित फसवणूक प्रकरणात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामीनदाराच्या अटीवर कल्पना खरातला दिलासा दिला आहे. दरम्यान, 2004 मधील कथित जमीन व्यवहारावर 22 वर्षांनी गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाने या प्रकरणातील विलंबाचीही नोंद घेतली आहे.

Thane Crime: संतापजनक! नातेवाईकाने आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि नको ते केलं; आरोपी फरार

काय नेमकं प्रकरण?

२००४ मध्ये जमीन हडप केल्याचा गुन्हा तब्बल २२ वर्षांनी २०२६ मध्ये दाखल करण्यात आला. या प्रदीर्घ कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदी खत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नव्हती, ही बाब न्यायालयाने प्रकर्षाने नोंदवली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. करार करतांना फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासात समोर
आलेले नाही, हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरीत्या झाला असून, केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयाने कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपी कल्पना खरातला पोलिसांच्या गुन्ह्याशी संबंधित तपासात (Police Investigation) पूर्ण सहकार्य करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या निकालामुळे सिन्नर परिसरातील या बहुचर्चित कथित फसवणूक प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

अशोक खरातविरोधात 7 जुलैला सुनावणी

भोंदू अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात याच्याविरोधात देवीशक्ती असल्याचा दावा करून महिला भाविकांची फसवणूक करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक फसवणूक करणे, खंडणी उकळणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत त्याच्याविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद असून, त्यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आठ गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता पोलिसांनी २ गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. २३ जून रोजी दोन प्रकरणांची सुनावणी न्यायालयात होणार होती. मात्र, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्पना खरात कोण आहेत?

    Ans: त्या कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पत्नी आहेत.

  • Que: हे प्रकरण कशाशी संबंधित आहे?

    Ans: दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे.

  • Que: न्यायालयाने कोणता निर्णय दिला?

    Ans: न्यायालयाने कल्पना खरात यांना अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Web Title: Nashik crime relief for godman ashok kharats wife kalpana kharat granted anticipatory bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Thane Crime: संतापजनक! नातेवाईकाने आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि नको ते केलं; आरोपी फरार
1

Thane Crime: संतापजनक! नातेवाईकाने आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि नको ते केलं; आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं
2

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात चेतनच्या नोकर माफीचा साक्षीदार; सिया-चेतनच्या अडचणी वाढल्या
3

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात चेतनच्या नोकर माफीचा साक्षीदार; सिया-चेतनच्या अडचणी वाढल्या

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
4

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.