
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक: नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात गाडीने चक्क तीन पलट्या घेतल्या असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव – रायते शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलट्या घेतला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या दुर्दैवी अपघाताची येवला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साई भक्तांवर काळाने घाला घातला असून त्या अपघातात तीन साई भक्तांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खळबळ! लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी कैद्याने घेतला गळफास
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपी कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव शिवदास भालेराव (वय 58, कैदी क्रमांक यूटी-802) असे आहे. तो सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याचीच तो शिक्षा भोगत होता. तो जून २०२४ पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आपली शिक्षा भोगत होता.
काय घडलं नेमकं?
शिवदास भालेराव याने रविवारी दुपारच्या सुमारास कारागृहातील एका ठिकाणी काश्याच्या तरी साहाय्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले. याची माहिती मिळताच कारागृहातील पोळी अमलदारांनी तातडीने त्यांना खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात सव्वा तिच्या सुमारास दाखल केले. मात्र तेव्हा वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कैद्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे मध्यवर्ती कारागृहात एकाच खळबळ उडाली आहे.