ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान
काय घडलं नेमकं?
शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दांडी बस स्टॉप परिसरात १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुली बसची वाट पाहत बसलेल्या होत्या. त्यावेळी परराज्यातून चादरी विक्रीसाठी गावात आलेल्या चौघांनी त्या मुलींचे फोटो काढले आणि कोठे जाणार आहात याबाबत विचारपूस केली. यामुळे गावात ‘मुले पळविणारी टोळी’ असल्याच्या अफवा पसरल्या. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित चौघांचा घेराव घालत त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले.
यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाणे आणि बोईसर विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दांडी येथील तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल संजय सलाट (वय २२), अल्पवयीन मुलगा, (वय १७) ३) अल्पवयीन मुलगा, (वय १३) ४) चंदा सुनिल सलाट (महिला), (वय २५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. पालघर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता तत्काळ पालघर नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन डायल ११२ किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लहान मुले-मुली पळवून नेल्याबाबत १९२ गुन्हे दाखल
पालघर जिल्ह्यात सन २०२५ मध्ये लहान मुले-मुली पळवून नेल्याबाबत १९२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी त्यापैकी १८२ मुले-मुली सुरक्षितरीत्या सापडली आहेत. उर्वरित १० प्रकरणांचा तपास सुरू आहे. तपासात बहुतेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन प्रेमसंबंध किंवा घरगुती वादातून मुले घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
Ans: मुलींचे फोटो काढल्याच्या संशयावरून चौघांवर मुलं पळविण्याचा आरोप झाला.
Ans: संतप्त ग्रामस्थांनी चौघांचा घेराव करून पोलिसांना माहिती दिली.
Ans: पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.






