Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बिल्डरांकडून शासनाची फसवणूक

शहरातील चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनींवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवायचे २० टक्के क्षेत्र हडप करण्यासाठी मोठा गैरप्रकार समोर आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 10, 2026 | 05:13 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा
  • बनावट कागदपत्रांचा घोळ
  • बिल्डरांकडून शासनाची मोठी फसवणूक
Nashik News : शहरातील चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनींवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवायचे २० टक्के क्षेत्र हडप करण्यासाठी मोठा गैरप्रकार समोर आला आहे. बनावट मोजणी नकाशे आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे खोटे शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

असा झाला घोटाळा!

महाराष्ट्र शासनाच्या २०१३ च्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार, ४००० चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्राच्या जमिनीवर गृहप्रकल्प विकसित करताना २० टक्के जागा म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमधील अनेक विकासक आणि जमीन मालकांनी ही तरतूद टाळण्यासाठी जमिनीचे तुकडे करून ते ४००० चौ.मी. पेक्षा कमी असल्याचे भासवले. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन चंद्रकांत काजळे (५५) यांनी याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली आहे.

तक्रारीत काय?

संबंधित जमीन मालक, प्रकल्प विकासक आणि त्यांचे अज्ञात सहकारी यांनी संगनमत करून म्हाडा, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणातील संबंधित विकासक आणि धारकांची माहिती आता महसूल विभागाकडून संकलित केली जात असून पुढील तपास सरकारवाडा पोलिस करत आहेत.

चौकशी समितीची नेमणूक

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा चौकशी अहवाल पोलिसांकडे सादर करण्यात आला असून, पोलिस योग्य ती कारवाई करतील. याप्रकरणी भूमि अभिलेख विभागातील अधिकारी, कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.

या भागांतील प्रकरणांचा समावेश

तपासणी अहवालानुसार, बनावट कागदपत्रे सादर केलेल्या प्रकरणांमध्ये खालील गावांमधील क्षेत्रांचा समावेश आहे. म्हसरूळ, आडगाव, नाशिक, विहीतगाव, वडनेर दुमाला, देवळाली, आगारटाकळी, नांदूर दसक, पंचक, गंगापूर आणि चेहडी बु. येथील प्रकरणांचाही यात समावेश आहे.

फसवणुकीची पद्धत

बनावट शिक्क्यांचा वापर भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या वापरून हे मोजणी नकाशे तयार केले गेले. कार्यालयातील दुरुस्ती नोंदवहीमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नसताना हे नकाशे तहसील कार्यालयात सादर करून जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आले.

४९ प्रकरणे उघड

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने या प्रकरणांची पडताळणी केली. म्हसरूळ, आडगाव, देवळाली, गंगापूर यांसह विविध ११ गावांमधील १०८ प्रकरणांची तपासणी करण्यात आली. यात धक्कादायक बाब अशी की, ४९ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात मोजणी झालेली नसतानाही भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट सही- शिक्के वापरून ‘हिस्सा फार्म नंबर १२’ आणि ‘गट बुक नकाशे तयार करण्यात आले.

Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण

Web Title: Mhada housing scam fake documents case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • mhada
  • MHADA Houses
  • mhada lottery news
  • Nashik
  • Nashik Crime
  • Nashik Latest News
  • scam

संबंधित बातम्या

केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्…
1

केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्…

धक्कादायक ! ‘गाडीवर फिरवून आणतो’ म्हणत 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने निर्जनस्थळी नेलं…
2

धक्कादायक ! ‘गाडीवर फिरवून आणतो’ म्हणत 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने निर्जनस्थळी नेलं…

Ashok Kharat Case : अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार; आता ‘या’ गुन्ह्यात चांगलाच अडकणार
3

Ashok Kharat Case : अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार; आता ‘या’ गुन्ह्यात चांगलाच अडकणार

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा
4

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.