crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक मधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका २० वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. पूजा डांबरे असे आत्महाताय करणाऱ्या मुलीचे नाव आहे. तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तिने गळफास घेण्याआधी हृदयद्रावक चिठ्ठी लिहिली होती. “आई, तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च खूप आहे. तू ताण नको घेऊ, तुझी माझ्यामुळे धावपळ होते,” असे लिहत आपल्या भावना व्यक्त केला आहे. ही घटना नाशिकच्या आडगाव परिसरातील असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूजाची आई नाशिक पोलीस (Nashik Police) दलात कार्यरत असून, तिची नेमणूक अंमलदार म्हणून झाली आहे. पूजाचे वडील व आई यांच्यात विभक्तपणा असल्याने ती आईसोबत राहत होती. आईच्या ड्युटीच्या तासांमुळे आणि कामाच्या स्वरूपामुळे पूजाला आईकडूनही पुरेसा वेळ मिळत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती सतत नैराश्यात होती. तिने चिठ्ठीत “आई, तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च खूप आहे. तू ताण नको घेऊ, तुझी माझ्यामुळे धावपळ होते” असे लिहिले आहे. आईला होणाऱ्या धावपळीमुळे आणि शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुण्यात वाहतूक पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन संपवलं जीवन
दरम्यान, पुण्यात एका पोलिसाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पुणे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव भागात घडली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंडला गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
मावळमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; लोणावळ्यात बंदुकीच्या धाकाने दिवसाढवळ्या लूट