लोणावळ्यात बंदुकीच्या धाकाने दिवसाढवळ्या चिक्कीच्या दुकानाची लुट करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
वडगाव मावळ : पर्यटनाची पंढरी समजलं जाणाऱ्या मावळ तालुक्यातला गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरला आहे. दिवसा ढवळ्या होणाऱ्या हत्या, दहशत, अपघात, महिलांवरील अत्याचार, जबरी चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी मावळ अक्षरशः हादरुन जात आहे. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र, पोलिसांच्या कारवाईवर समाधान होत नसल्याचे दिसून येते. कारण,मावळमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच,जुना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील चिक्की दुकानाला रविवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी बंदूक टाकून लुटण्याची घटना उघडकीस आली आहे.
काल (दि.20) रविवारी विकेंड असल्याने लोणावळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे लोणावळ्यामधील चिक्कीच्या दुकानदाराने पहाटेच दुकान उघडले होते. त्यावेळी ग्राहक असल्याचे भाषण दोन तरुण दुकानात आले आणि कॅडबरी चॉकलेट मागितली दुकानात फारशी वर्दळ नसल्याचे पाहून त्यांनी अचानक दुकानदाराला मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवत गल्ल्यातील पैसे लुटून पसार झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या चोरीच्या घटनेवेळी दुकानदार घाबरून गेला आणि त्याने कोणताही प्रतिकार केला नाही. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात लोणावळ्यात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणे वाढ झाली असून पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुन्हेगारांना उघडपणे वाव मिळतो आहे. सजग नागरिकांकडून आता लोणावळ्यात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी देखील होत आहे.
लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या झालेल्या वातावरणामुळे आणि भुशी धरणाला पाणी आल्यामुळे मुंबई व पुण्यातील लोकांची पावले लोणावळ्याकडे वळत आहे. निसर्ग सौंदर्याची देणगी लाभलेल्या लोणावळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शनिवार रविवार लोणावळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र चोरीच्या आणि घर व दुकान फोडीच्या घटना होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळमध्ये मंडळ अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक
मावळ तालुक्यातील कुसगाव येथील फेरफार नोंद रद्द करण्यासाठी तक्रारदाराकडून २ लाख १० हजाराची लाज स्वीकारणाऱ्या मंडलाधिकारी व एका खाजगी साथीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.हि कारवाई भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाईन रोडवर मंगळवारी (१५ जुलै) करण्यात आली. याप्रकरणी मारुती महादेव चोरमले (५३) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती जयेश बाळासाहेब बारमुख (३३, चांदखेड, मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.