Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: कोडवर्ड ए’ मध्ये दडलंय खरातचं सत्य! ३२ जीबीचे पेनड्राइव्ह अन् १९ फोल्डर्समधून धक्कादायक माहिती समोर

नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात अनेक गैरप्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 10, 2026 | 11:55 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:

Ashok Kharat Case: भोंदूगिरी आणि अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तपास यंत्रणांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांचे तब्बल १६० GB डिजिटल पुरावे गोळा केले असून, फॉरेन्सिक अहवाल सादर झाल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला आहे.

एसआयटीने (SIT) एकूण ४ डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण केली आहे. यामध्ये १६० GB डेटा आढळला असून, त्यातून खरातचे अनेक धक्कादायक व्यवहार आणि कृत्ये उघड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याला विशिष्ट कोडवर्ड दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘A’ या कोडवर्ड अंतर्गत लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत देणारे पुरावे वर्गीकृत करण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील सर्व संशयास्पद हालचालींचा तपशील पोलिसांना खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून मिळाला आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचे कार्यालय आणि घरावर केलेल्या कारवाईमध्ये काही पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. यात 32GB क्षमतेचे तसेच 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेन ड्राईव्ह, 64GB क्षमतेचे OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉप या उपकरणे स्कॅन केली जात आहेत. फॉरेन्सिक आणि सायबर टीमने जप्त कलेले हे सबळ डिजिटल पुरावे आहेत. न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी एसआयटीने साक्षीदार आणि पिडीतांचेही जबाब नोंदवले आहेत. वेगवेगळ्या 160 जीबीच्या डिजिटल उपकरणांमध्ये खरातचे काळे कारनामे लपले आहेत. हेच पुरावे हाती लागल्याने आता खरातच्या गळ्याभोवतीचा फास अधिक आवळला जाणार आहे.

तपासणी दरम्यान हाती लागलेल्या प्रत्येक डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे विशेष कोडवर्ड दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘ए’ या कोडवर्डचा अर्थ खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे थेट पुरावे असा आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे पुरावे गोळा केले असून, ते न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

कार्यालयातील ‘काळे कारनामे’

नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात अनेक गैरप्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या कालावधीतील सर्व संशयास्पद हालचालींची माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी खरातने पीडितेची कशा प्रकारे फसवणूक केली, याची सविस्तर माहिती दिली. “तुला मुलगाच होईल,” असे खोटे आश्वासन देऊन खरातने एका गर्भवती महिलेला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप वकिलांनी केला आहे.

या सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Nashik shocker 160 gb of digital evidence found against accused ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Nashik News
  • Nashik Police

संबंधित बातम्या

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
1

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

धक्कादायक ! वीज खांबावरील बिघाड दुरूस्त करताना बसला जोरदार शॉक; तरुणाचा जागीच मृत्यू
2

धक्कादायक ! वीज खांबावरील बिघाड दुरूस्त करताना बसला जोरदार शॉक; तरुणाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.