Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक धर्मांतर प्रकरण! अखेर फरार निदा खान आली समोर, “मी प्रेग्नंट आहे” म्हणत न्यायालयाकडे मागितला दिलासा

नाशिकमधील Tata Consultancy Services (TCS) येथे कथित “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला. याची मुख्य आरोपी निदा खान फरार असून तिचे लोकेशन आता समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 02:10 PM
नाशिक धर्मांतर प्रकरण! अखेर फरार निदा खान आली समोर, "मी प्रेग्नंट आहे" म्हणत न्यायालयाकडे मागितला दिलासा

नाशिक धर्मांतर प्रकरण! अखेर फरार निदा खान आली समोर, "मी प्रेग्नंट आहे" म्हणत न्यायालयाकडे मागितला दिलासा

Follow Us
Follow Us:
  • TCS नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळ झाल्याचे आरोप आहेत.
  • मुख्य आरोपी निदा खान फरार असून तिचे लोकेशन आता समोर आले आहे.
  • निदा खानच्या कुटुंबाने ती गरोदर असल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमधील काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याची झोप उडवली आहे. येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आयटी कंपनीमध्ये तब्बल दोन वर्षांपासून सक्तीचे धर्मांतर आणि लैंगिक छळ होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणात ८ ओरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आरोपी निदा खान फरार असल्याचे सांगितले जात होते. अखेर या प्रकरणाने नवे वळन घेतले असून निदा खानने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. तिचे लोकेशनही आता समोर आले आहे. जामिनात तिने नक्की काय लिहिलं ते जाणून घेऊया.

Ashok Kharat : “जावई नाही आला तरी मुलगी घरी आली पाहिजे…; अशोक खरातच्या सासूने फोडला टाहो

कुठे आहे निदा खान?

निदा खान ही नाशिकच्या TCS कंपनीमध्ये एचार म्हणून काम करत होती. धर्मांतर प्रकरणात तिची मोठी भूमिका असून ऑफीसमध्ये तिला दबंग मॅम म्हणून ओळखलं जात असल्याची माहिती आहे. आपले काळे उद्योग बाहेर येताच निदा खान घाबरली आणि तिने नाशिकमधून पळ काढला. पोलिसांद्वारे तिचा शोध घेतला जात होता आणि यातच आता ती मुंबईत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती गर्भवती आहे. फरार निदा खानने नाशिकमधील स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तिने वैद्यकीय स्थितीला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून नमूद केले आहे.

ऑफीसमध्ये धर्मांतरासाठी केली जात होती सक्ती

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये बऱ्याच काळापासून नमाज पडण्यासाठी आणि मासांहार खाण्यासाठी दबाव टाकला जात होता. यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप देखील तयार केला गेला होता ज्यात निदा चांगलीच सक्रिय होती. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल केली आहे ज्यात दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार, शाहरुख शेख आणि एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून फक्त निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

नेमकं काय प्रकरण आहे?

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२६ च्या कालावधीत कंपनीत वरिष्ठ सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ केला जात होता. एचार डिपार्टमेंटकडे तक्रार करुनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका कर्मचाऱ्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा महिलेने या गोष्टीची तक्रार कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे केली तेव्हा छळाच्या तक्रारींची कंपीनीकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. उलट त्यांनी या कृतींना प्रोत्साहन दिले असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निदा खानने एका महिला कर्मचाऱ्याला तक्रार दाखल न करण्यास सांगितले आणि “अशा गोष्टी घडतच राहतात,” असेही म्हटले.

Nashik News : पारा ४१.४ अंशावर…! हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद, नाशिक @ ३९.५; सतर्कतेच्या सूचना

१८ ते २५ वयोगटातील महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले

सांगितले जात आहे की, यात मुख्य करुन कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात होते ज्यांचे वय १८ ते २५ वयोगटात आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ एफआयआर दाखल करण्यात आले असून यात अनेक कर्मचाऱ्यांकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. धार्मिक छळ, सक्तीचे धर्मांतर, हिंदू देवतांचा अपमान करणे, जबरदस्तीने मांसाहारी अन्न खाऊ घालणे, दबाव आणणे आणि लोकांना विशिष्ट धार्मिक चालीरीतींचे पालन करायला लावणे अशा आरोपांचा यात समावेश आहे.

Web Title: Nashik tcs conversion case accused nida khan pregnant wants court relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Nashik
  • TCS
  • TCS Nashik Case

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!
2

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?
3

TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.