Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

SIR Voter List: एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १० लाख २७ हजार मतदारांची नावे स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी यांसह विविध कारणांमुळे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 12, 2026 | 11:29 AM
मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण! (फोटो सौजन्य-ChatGPT)

मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण! (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • मतदार यादीतून नाव वगळले?
  • निवडणूक आयोगाच्या विशेष शिबिरांना अत्यल्प प्रतिसाद
  • मतदानाच्या हक्कावर टांगती तलवार
SIR Voter List: नाशिक प्रारूप मतदार यादीतून नावे वगळलेल्यांना पुन्हा पुरावे सादर करून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याची संधी असतानाही बहुतांश मतदारांमध्ये मात्र याबाबत अनास्था दिसून येत आहे. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा जिल्ह्यात सध्या दुसरा टप्पा सुरु आहे. या टप्यात प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नावे वगळलेल्यांना नोटीसा बजावून तसेच विशेष शिबिरे घेऊनही मतदार प्रतिसाद देत नसल्याने बीएलओंपुढे कामे पूर्ण कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (SIR Voter List)

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात तब्बल १० लाख २७ हजार मतदारांची नावे प्रारूप यादीतून विविध कारणांमुळे वगळण्यात आली आहेत. स्थलांतर, मयत, दुबार नोंदणी, अशा कारणांचा यात समावेश आहे. मात्र, यातील अनेक मतदारांचे आक्षेप किंवा पुरावे तपासल्याशिवाय मतदार यादीमधून नावे कायमस्वरूपी वगळता येणार नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या मतदारांना आवश्यक पुरावे सादर करून मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्याची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे.

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

केंद्रनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन

जिल्हा प्रशासनाकडून गेल्या एक महिन्यापासून मतदारसंघनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. शनिवार आणि रविवार बीएलओना मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवमतदार नोंदणी, पत्त्यात किंवा नावात दुरुस्ती आणि नोटीस बजावलेल्या मतदारांचे कागदपत्रे तपासण्याचे आदेश आहेत. १२ ऑक्टोबरपर्यंत आवश्यक पुरावे सादर करून नाव समाविष्ट करण्याची शेवटची राहणार आहे. मात्र, प्रत्यक्षात शिबिरांना अत्यल्प प्रतिसाद मिळत असून शनिवारी शहरात झालेल्या शिबिरातही फारसे मतदार फिरकलेच नाहीत. वारंवार फोन करून, घरी जाऊन संपर्क करूनही मतदार प्रतिसाद देत नसल्याची कैफियत बीएलओंनी मांडली आहे. दुसरीकडे, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीने काम करण्याच्या सक्त सूचना देण्यात आले आहे.

अखेर ६५ हजार नवमतदारांची नोंदणी पूर्ण

शिबिराच्या माध्यमातून १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या पात्र युवकांनाही मतदार म्हणून नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार ६५ हजार नवीन मतदारांनी नमुना ६ भरून नोंदी पूर्ण करून घेतली हा अजून वाढण्याची शक्यता आहे.

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

Web Title: Voter list sir revision 10 lakh 27 thousand names deleted sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Nashik
  • SIR
  • Voter List

संबंधित बातम्या

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
1

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
2

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
3

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.