acident (फोटो सौजन्य :social media)
पाऊस आणि हिरवं गार निसर्ग! या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक बाहेर पडतात. पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. गड किल्ल्यावर जाणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे. ट्रेकिंग करण्यासाठी अनेक तरुण तरुणी जातात आणि निसर्गाचा आनंद लुटतात. अश्याच प्रकारे ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून काही अंतरावर असलेला हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी दोन मित्र गेले होते. परंतु वाटेत त्यांचा भीषण अपघात झाला आणि जागीच मृत्यू झाला. पंकज दातीर आणि अभिषेक अशी मृतकांची नावे आहे. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज आणि अभिषेक ट्रेकिंग करून परतत होते. यादरम्यान नाशिकच्या त्र्यंबक रोड येथे झालेल्या भीषण अपघातात या दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील बेंझे फाटा येथून नाशिक रोडकडे येताना यांची कार भरधाव वेगात होती. त्यादरम्यान कारचालकाचे कैरवरून नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. कारची दुभाजकाला धडक बसली. धडक झाल्यानंतर कार चार ते पाच वेळा पलटली आणि थेट २५ फुटांवर फेकली गेली. यामध्ये कारचा चक्काचुर झाला आणि पंकज दातीर आणि अभिषेक हे दोघे मित्र अपघातात जागीच ठार झाले आहेत.
पंकज दातीर आणि अभिषेकला ट्रेकिंगची आवड असल्याने दोघेही ट्रेकिंगसाठी त्र्यंबकेश्वर येथे हरिहर किल्ल्यावर गेले होते. ट्रेकिंग झाल्यानंतर खाजगी कामानिमित्त त्रंबकेश्वर येथे गेले होते. परतत असताना वळन असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चालक कार भरधाव वेगाने चालवित होता, यातूनच हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बीड पोलिसांनी घेतले ताब्यात
बीड जिल्ह्यातील सिरसाळायेथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. सिरसाळा – मोहा रस्त्यावरील खंडणी जवळ ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिघांचे नाव राम धोत्रे, करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार असे आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी राम धोत्रे याने गावठी कट्टा करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. संशयितांकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं असून, त्यांच्याकडे आणखी कोणते हत्यार होते का, याचा तपास सुरू आहे.