Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

घणसोली रेल्वे स्थानका जवळील रिक्षा स्थानकात प्रवासी भाडे घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन रिक्षा चालक गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या 18 वर्षीय युवकाची चाकूने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 18, 2026 | 08:59 PM
Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
Follow Us
Follow Us:
  • भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी
  • झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
नवी मुंबई/सावन वैश्य : घणसोली रेल्वे स्थानका जवळीलबर्गर किंग समोर रिक्षा स्थानकात प्रवासी भाडे घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन रिक्षा चालक गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या 18 वर्षीय युवकाची चाकूने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे घणसोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

मृत युवकाचे नाव आयान शेख (वय 18) असे असून तो घणसोली परिसरात राहत होता. या घटनेत त्याचा भाऊ आदिल शेख तसेच रिक्षा चालक राजेंद्र वाशीवाले हे जखमी झाले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुब्या उर्फ सुभाष जाधव आणि सत्या उर्फ सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकर यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली.

प्रवासी भरण्यावरून सुरू झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोली रेल्वे स्थानकाबाहेरील बर्गर किंग समोर मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षा चालक प्रवाशांसाठी थांबत असतात. प्रवासी उचलणे, भाडे मिळवणे आणि रिक्षा क्रमांकावरून येथे अनेकदा चालकांमध्ये वाद होत असतात. परिसरात दादागिरी आणि मारामारीच्या घटनाही यापूर्वी घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.रविवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. परिसरातील दगड, काठ्या यांचाही वापर करण्यात आला. त्यामुळे स्टेशन जवळ बर्गर किंग समोर मोठी गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला.

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आयानवर चाकू हल्ला

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आदिल शेख यांनी त्यांचा धाकटा भाऊ आयान शेख याला घटनास्थळी बोलावले. आयानने दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.गंभीर जखमी झालेला आयान रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आयानला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न, सार्वजनिक शांततेचा भंग आणि हाणामारीचे गुन्हे दाखल केले होते. मात्र आयानचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवण्यात आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षा चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकर यांना अटक केली.न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी यांनी दिली.

स्टेशन परिसरातील रिक्षा दादागिरी पुन्हा चर्चेत

या घटनेनंतर घणसोली स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांची दादागिरी आणि प्रवासी भाड्यावरून होणारे वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्थानिक नागरिकांनी स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची तसेच रिक्षा स्थानकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.

Web Title: Navi mumbai a fight broke out between rickshaw drivers over a fare dispute 18 year old youth killed in the scuffle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…
1

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी
2

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले
3

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
4

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.