Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: मॅट्रिमोनी साईटवरून डझनभर महिलांची फसवणूक; ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून शोषण करणारा 21 वर्षीय तरुण अटकेत

नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणाने मॅट्रिमोनी साईटवर बनावट ओळख वापरून महिलांची फसवणूक केली. स्वतःला शास्त्रज्ञ/डॉक्टर सांगत लैंगिक व आर्थिक शोषण केलं. अनेक शहरांत गुन्हे उघड; आरोपी अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 10:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बनावट प्रोफाइलद्वारे महिलांना जाळ्यात ओढलं
  • लग्नाचे आमिष देऊन लैंगिक व आर्थिक शोषण
  • अनेक शहरांत गुन्हे; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई: नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला ‘इस्त्रो’चा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून डझनभर महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या अशोक खरातनंतर आता या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आदर्श म्हात्रे (२१ वर्ष) असे आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय नेमकं प्रकरण?

आदर्श म्हात्रे हा केवळ १० वी पास असून याने मॅट्रिमोनी साईट्सवर 12 वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाईल्स तयार केले होते. ज्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि गलेलठ्ठ पगार घेतात, अशा महिलांना तो आपले लक्ष्य करायचा. तो कधी शास्त्रज्ञ कधी डॉक्टर तर कधी बँक अधिकारी असल्याचे सांगायचा. त्यांनतर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो खोट्या ओळखीची कागदपत्रेही वापरत होता. स्वतःचे राहणीमान उच्च ठेवून आणि लग्नाचे आमिष दाखवून तो महिलांशी जवळीक साधायचा.

Rupali Chakankar Arrest Demand: रुपाली चाकणकरांना अटक होणार?

एकदा विश्वास निर्माण झाला की, तो त्यांच्याशी शारीरिक लगट करून लैंगिक शोषण करत होता. एवढेच नाही तर अनेक महिलांकडून त्याने लग्नाचे कारण सांगून किंवा वैयक्तिक अडचणींचे कारण देऊन मोठी रक्कम उकळल्याचेही तपासात समोर आले आहे.

अनेख जिल्ह्यात गुन्हे दाखल

आदर्श म्हात्रेवर नवीमुंबई मध्ये नाही तर मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींनुसार, हा तरुण अत्यंत सराईतपणे आपली ओळख बदलून महिलांची दिशाभूल करत होता.

पोलीस तपास सुरु

नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील धागेदोरे पुण्यातही आढळले आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून अधिक तपास सुरू केला आहे. त्याच्या संपर्कात आणखी किती महिला होत्या आणि त्याने आतापर्यंत एकूण किती लाखांची फसवणूक केली आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Beed Crime: बीडमध्ये तारा चोरीचा प्रयत्न जीवावर, टॉवर कोसळून 2 ठार; नंतर अपघाताचा बनाव मात्र…, काय नेमकं प्रकरण?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी महिलांना कसा फसवत होता?

    Ans: तो स्वतःला शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा अधिकारी असल्याचे सांगून बनावट प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करत होता.

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि खोट्या ओळखीचा वापर.

  • Que: या प्रकरणाचा तपास कुठे सुरू आहे?

    Ans: नवी मुंबईनंतर पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Navi mumbai dozens of women duped via matrimony site 21 year old youth arrested for exploitation while posing as isro scientist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
1

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी
2

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.