Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. ड्रग्ज विक्री, साठवणूक किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 08:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात करडी नजर.
  • संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन.
  • माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्याचे पोलिसांचे आश्वासन.
नवी मुंबई/ सावन वैश्य: आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई विभागाने मोठी कारवाई केली आहे. सराईत ड्रग तस्कर नवीन गुरुनाथ चिचकर याला PIT-NDPS कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले आहे. कोकेन, हायड्रोपोनिक गांजा, कॅनाबिस गमीज आणि LSD तस्करीच्या नेटवर्कशी संबंधित असलेल्या चिचकरवर NCBने मोठा शिकंजा आवळला आहे.

काय नेमकं प्रकरण?

एनसीबीच्या माहितीनुसार, चिचकर हा कोकेन, हायड्रोपोनिक गांजा, कॅनाबिस गमीज आणि एलएसडी यांसारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय होता. एनसीबी, नवी मुंबई पोलीस तसेच इतर तपास यंत्रणांनी त्याला यापूर्वी चार वेळा अटक केली होती.

२०२१ मध्ये एलएसडी आणि गांजाच्या व्यावसायिक प्रमाणातील प्रकरणात नाव समोर आल्यानंतर तो भारतातून फरार झाला होता. तपासादरम्यान त्याने थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती (यूएई ) आणि वनुआटू येथील आंतरराष्ट्रीय ड्रग पुरवठादारांशी संबंध प्रस्थापित केल्याचे उघड झाले. जानेवारी २०२५ मध्ये एनसीबीने केलेल्या कारवाईत ११.५४० किलो कोकेन, हायड्रोपोनिक गांजा आणि कॅनाबिस गमीज जप्त करण्यात आले होते. या तपासात थायलंडमध्ये बसून चिचकर अमेरिकेतून कोकेनची खरेदी करून भारतात पुरवठ्याचे जाळे चालवत असल्याचे निष्पन्न झाले. नवी मुंबईतील हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातही त्याचा सहभाग समोर आला होता.

Beed Crime: किरकोळ कारणावरून तरुणाला संपवलं, गावकऱ्यांचा रास्ता रोको

एनसीबीच्या विनंतीनंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये मलेशियातून त्याला भारतात आणण्यात आले आणि एनसीबीने त्याला अटक केली. तपासादरम्यान एनसीबीने आर्थिक चौकशी करून ड्रग तस्करीतून मिळालेल्या उत्पन्नाशी संबंधित १० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या चल व अचल मालमत्ता गोठवल्या आहेत. ही कारवाई SAFEMA कायद्यांतर्गतही मंजूर करण्यात आली आहे.

एनसीबीने स्पष्ट केले की, चिचकर पुन्हा ड्रग तस्करीत सक्रिय होण्याची शक्यता असल्याने समाजहित आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्याच्यावर पी.आय.टी -एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या महसूल विभागाच्या पी.आय.टी -एनडीपीएस (PIT-NDPS) विभागाने १५ मे २०२६ रोजी जारी केलेला ताबा आदेश १६ जून २०२६ रोजी अंमलात आणण्यात आला. या आदेशानुसार नवीन चिचकर याची पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून चेन्नई येथील पुझल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

PIT-NDPS कायदा काय?

PIT-NDPS Act, 1988 हा अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीत वारंवार सहभागी होणाऱ्या सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठीचा विशेष कायदा आहे. या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला भविष्यातील गुन्हे रोखण्यासाठी ठराविक कालावधीसाठी प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवता येते. संघटित ड्रग सिंडिकेटचे जाळे खंडित करण्यासाठी हा कायदा प्रभावी मानला जातो.

नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

नवी मुंबई पोलीस अंमली पदार्थांविरोधात करडी नजर ठेवून आहेत. कोणत्याही परिसरात ड्रग्ज विक्री, साठवणूक किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अमली पदार्थ विरोधी पथक) संदीप निगडे यांनी असे आवाहन केले आहे.

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?

    Ans: ड्रग्ज विक्री, साठवणूक किंवा संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: माहिती देणाऱ्याची ओळख उघड केली जाईल का?

    Ans: नाही, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

  • Que: हे आवाहन कोणी केले आहे?

    Ans: अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी हे आवाहन केले आहे.

Web Title: Navi mumbai habitual drug lord involved in cocaine and hydroponic cannabis smuggling netted by ncb arrested under pit ndps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
1

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
2

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
3

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.