नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहे. यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. आता केज तालुक्यातून हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. टाकळी येथील विलास घुले या तरुणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे रात्रीच्या सुमारास चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. ही हत्या बॅनर फाडल्याच्या कारणावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. यादरम्यान केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावकरी व नातेवाईकांकडून दोनवेळा रास्ता रोकोचा प्रयत्न देखील करण्यात आला. आता या प्रकरणात केज पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
पैशांच्या वादातून लिपिकाचे अपहरण, निर्जन स्थळी 8 तास डांबून बेल्ट-काठीने अमानुष मारहाण; जीवे मारण्याची धमकी
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लिपिकाला निर्जन स्थळी नेत आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या परळीत घडली. या प्रकरणातील पीडित लिपिकाचे नाव अनिल पत्की असे आहे. तर महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. तर आरोपीचे नाव वैजनाथ यादव असे आहे. त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. या व्यवहारापोटी पत्की यांनी यादव यांना १ लाख रुपये परत केले. वैजनाथ यादव यांनी आणखी चार लाख रुपयांसाठी तगादा लावला. थेट लिपिकाचे घर गाठले आणि गाडीवर बसवत धारावती तांडा परिसरातील निर्जन स्थळी एका झाडाखाली नेले. तिथे यादव यांच्या दोन साथीदारांनी बेल्ट आणि लाकडाच्या साह्याने बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर लिपिकाला पोलिसांकडे गेला तर जीवे मारण्याची धमकी दिली. ही मारहाण सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान करण्यात आली. या मारहाणीनंतर लिपिकाला आरोपीच्या दुकानासमोर सोडले आणि त्यांचा मोबाईल देखील घेतले असे फिर्यादीत म्हंटले आहे.
साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी फाटा परिसरात घडली.
Ans: बॅनर फाडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकरी आणि नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यात आंदोलन केले.






