फोटो सौजन्य: iStock
सावन वैश्य: एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील तुर्भे परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी सात ओळखीच्या आणि तीन अनोळखी इसमांविरुद्ध तुर्भे एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
फर्यादी आशुतोष मोहन धुर्वे (वय 31) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता ही घटना घडली. आरोपी विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे, विकी पाटीलची पत्नी चारुशिला, विद्वेष घरत, शकील, मौला आणि अन्य तीन अनोळखी इसम यांनी एकत्र येऊन तक्रारदार व त्याच्या मित्रांवर हल्ला केला.
Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वाद मिटविण्याच्या बहाण्याने फिर्यादींना घरी बोलावून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान किशोर वरड याच्या डोक्यावर बॅट आणि फायबर रॉडने प्रहार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर तो बेशुद्ध झाला असून सध्या त्याच्यावर वाशी एमजीएम रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच फिर्यादी आशुतोष धुर्वे यांच्या हातावरही बॅटने प्रहार करून फ्रॅक्चर करण्यात आल्याचे नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या स्कूटीचे हँडल, स्पीडोमीटर आणि मागील भागाचे नुकसान केले आहे.
वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणी पोलिसांनी मारहाण, दुखापत व मालमत्तेचे नुकसान या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. एपीएमसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाधमारे आणि विद्वेष घरत या चार आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहे.