वडगाव शेरी आमदार बापू पठारे मारहाण प्रकरणी ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Pune Crime News : पुणे : अक्षय फाटक : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राड्याला आता नवा नाट्यमय ट्विस्ट मिळालाय. या प्रकरणात आमदार बापू पठारे आणि त्यांच्या समर्थकांना झालेल्या धक्काबुक्कीची चर्चा रंगली असताना, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही” असं म्हणत ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.
शनिवारी (दि.04) लोहगाव येथील गाथा लॉन्समध्ये आमदार बापू पठारे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांचं आणि बंडू खांदवे यांच्या बोलण्याचे शाब्दिक चकमकीत रूपांतर झाले. या वादानंतर दोन्ही गटातील समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आणि काहींना मारहाण झाल्याची माहिती मिळाली. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बंडू खांदवे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या राड्यात ‘सचिन पठारे’ नावाच्या तरुणाला मारहाण झाली असल्याचं वृत्त आल्यानंतर, त्याच नावाचा दुसरा तरुण ॲड. सचिन पठारे हा चर्चेत आला. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही. माझं या घटनेशी काहीही संबंध नाही. नामसाधर्म्यामुळे अनेक जण मला फोन करून विचारपूस करत आहेत, ज्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे.” असे ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ॲड. पठारे हे भाजपचे कार्यकर्ते असून पूर्वी आमदार बापू पठारे यांचे समर्थक होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. ते म्हणाले, “मी आगामी महानगरपालिका निवडणुका लढविण्याची तयारी करत आहे. मात्र या घटनेमुळे माझी विनाकारण बदनामी झाली आहे. याचा माझ्या प्रतिमेवर परिणाम होत आहे.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “आता माझे आणि बापू पठारे यांचे कोणतेही संबंध नाहीत. या घटनेत माझं नाव जोडणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे.” अशी भूमिका पठारे यांनी व्यक्त केली आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलं असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा नक्की कोणत्या दिशेने वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांवर प्राणघातक हल्ला
पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना पोलिसांवर कोयत्याने वार केला आहे. ही घटना लॉ कॉलेज रोडवर काल रात्री १ वाजताच्या सुमारास घडली आहे. आता पुन्हा पोलिसचं असुरक्षित आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ड्युटी संपवून घरी जात असतांना लॉ कॉलेजरोडवर बाईक वरून जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनिट युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही घटना रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे.