crime (फोटो सौजन्य : social media)
नवी मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नवी मुंबईमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या बायकोला संपवलं. पत्नी झोपेत असतांना आपल्या मुळासमोरच धारधार शास्त्राने तब्बल १५ वेळा सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये घडली आहे. मृत महिलेचे नाव गौरी शिरसाट (वय ३४) असे आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचा नाव गणेश शिरसाट असं आहे.
Nagpur News : सत्रापूर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश शिरसाट आणि मृत गौरी हे दोघेही कोपरखैरणे सेक्टर १९ मधील जय आंबे परिसरात भाड्याने राहत होते. आरोपी गणेश शिरसाट याची नौकरी गेल्यामुळे तो घरीच होता. तर घर चालवण्यासाठी मृत गौरी नर्स म्हणून काम करायची. या दोघांना 8 आणि 2 वर्षांची दोन मुले असून आठ वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. बुधवारी रात्री ७ वजनाच्या सुमारास गणेश आणि गौरीमध्ये मोठं भांडण झालं. गणेश गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणाने दोघांमध्ये वाद झाले. आणि वाद विकोपाला गेला. गणेशला राग अनावर झाला आणि रंगाच्या भारत गणेशन आपल्या दिव्यांग मुलाच्या समोर पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने १० ते १५ वार करून तिची हत्या केली. काही वेळानंतर गणेश भानावर आला. त्याच्याहातून काय घडलं हे त्याला समजल्यानंतर त्याला धक्का बसला. त्याने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा सगळं प्रकार शेजारी राहणाऱ्या महिलेनं पहिला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी गणेश शिरसाटला ताब्यात घेतलं. गौरीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर आरोपी गणेशवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल काढून घेतला म्हणून राग आला अन्…