
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुणे पोलिसांकडून शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी आता थेट पुणे पैटर्न राबवायला सुरुवात केली. शहराच्या अनेक भागात गुंड हे गाड्यांची तोडफोड करणे , दहशत निर्माण करणे अशा गोष्टी करतात. हातात नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता पुणे पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यातील काळेपाडळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुंडानी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आता त्यावर थेट कारवाई करत गुंडांना गुडघ्यांवर चालायला लावल आणि भर चौकात उठबाशी काढायला लावल्या. पुणे पोलिसांनी केलेल्या या कृतीने नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली आहे.
गाड्या फोडाल तर गुडघ्यावर चालाव लागेल
कारवाई करण्यात आलेले गुन्हेगार हे सराईत आहेत. त्यांच्यावर पुणे पोलिसांनी एक्शन घेतली. गुन्हेगारांच्या दहशतीला सामान्य नागरिक पण वैतागले आहेत. पोलिसांनी थेट रस्त्यावर आणत नागरिकांसमोरच उठाबशा काढायला लावल्या आणि त्यांना गुडघ्यांवर पण बसवले. पोलिसांकडून सज्जड दम देण्यात आला आहे. जर या पुढे गुन्हेगारी कृत्य केल तर मग मात्र सात जन्म लक्षात राहतील अशी कारवाई करावी लागेल. नवीन कायद्याप्रमाणे प्रॉपर्टी सील करावी लागेल असा सुद्धा सज्जड दम पोलिसांनी दिल आहे. काल रात्री पोलिसांनी ही कारवाई करत गुन्हेगारांना धडा शिकवला.
दोन दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील पोलीस आयुक्तांना भेटले
पुण्यातील गुंडगिरी कमी व्हावी यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. भेट घेत शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र दोन दिवस उलटत नाहीत तोवर कोथरूडमध्ये गुन्हेगारांनी गाड्या फोडल्या आणि ज्या सीसीटीव्ही मध्ये घटना कैद होणार होती तो कैमरा सुद्धा त्यांनी कोयत्याने फोडण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यावर आता पुणे पोलीस आयुक्त कसा आवर आणतात हे पाहावे लागेल.
Ans: पुणे
Ans: काळेपाडळ
Ans: पोलीस आयुक्त