Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या स्टॅम्पवर नवे व्यवहार; कोट्यवधींची फसवणूक करून मुख्य आरोपी अद्याप फरार

संबंधित आरोपींनी जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर वापरून खोटे व्यवहार दाखवले. काही प्रकरणांमध्ये २०१० सालचे स्टॅम्प पेपर २०२४ मध्ये वितरित झाल्याचे दाखवून बनावट पावत्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2026 | 09:04 AM
जुन्या स्टॅम्पवर नवे व्यवहार; कोट्यवधींची फसवणूक करून मुख्य आरोपी अद्याप फरार

जुन्या स्टॅम्पवर नवे व्यवहार; कोट्यवधींची फसवणूक करून मुख्य आरोपी अद्याप फरार

Follow Us
Follow Us:

पाचगणी : वाई तालुक्यात स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून भरत अनंत घरत याचे नाव तक्रारीनुसार पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात प्रतिक घरत व कमलेश म्हात्रे यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर वापरून खोटे व्यवहार दाखवले. काही प्रकरणांमध्ये २०१० सालचे स्टॅम्प पेपर २०२४ मध्ये वितरित झाल्याचे दाखवून बनावट पावत्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर न्यायालयीन प्रक्रियेलाही गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी संगनमत करून खोट्या सही, बनावट शिक्के आणि खोटी पावती तयार करून मोठ्या रकमेचे व्यवहार दाखवले. विशेष म्हणजे, काही व्यवहारांमध्ये स्टॅम्प विक्रेत्याचा परवाना रद्द झाल्यानंतरही त्याच्या नावाने कागदपत्रे तयार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Madhyapradesh Crime : कॅमेऱ्यासमोर अश्रू, दरोड्याची खोटी कहाणी; मात्र एक ट्विस्ट आणि हत्येचा बनाव उघड, काय नेमकं प्रकरण?

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी मुख्य आरोपी भरत घरत अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक दिवस उलटूनही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने वाई परिसरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

“अखेर आरोपीला संरक्षण कोण देत आहे?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काहींच्या मते, या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तपासाची गती संथ असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, बनावट स्टॅम्प पेपरच्या आधारे न्यायालयीन प्रकरणांमध्येही कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप समोर येत आहे. जर हे आरोप पुढील तपासात सिद्ध झाले, तर हा प्रकार केवळ फसवणूक नसून न्यायव्यवस्थेलाही आव्हान देणारा गंभीर गुन्हा ठरू शकतो.

वाई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला, तरी मुख्य सूत्रधाराचा माग काढण्यात अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे “वाई पोलीस आरोपींना कधी अटक करणार?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
या संपूर्ण घोटाळ्यामुळे स्टॅम्प पेपर व्यवहारांवरील विश्वास डळमळीत झाला असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांचे लाखो-कोट्यवधी रुपये धोक्यात घालणाऱ्या या घोटाळ्याचा छडा लावून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सध्या केली जात आहे.

Web Title: New transactions on old stamp papers mastermind still at large after committing fraud worth crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Fraud Case
  • Wai News

संबंधित बातम्या

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा
1

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
2

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
3

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!
4

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.