Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Siddiuqe Case: NIA आवळणार लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या मुसक्या; पहिला फास थेट भावाच्या गळ्यात

बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचला आरोपीच्या चौकशीदरम्यान गोळीबार करणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे समोर आले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 25, 2024 | 01:02 PM
Baba Siddiuqe Case: NIA आवळणार लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या मुसक्या; पहिला फास थेट भावाच्या गळ्यात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे. एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोई लॉरेन्सपचा भाऊ आहे. त्याने गायक आणि राजकारणी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपींपैकी एक आहे. 2023 मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरूद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. एका अहवालानुसार तो बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पळून गेला आहेय.

मिळालेल्या माहितीनुसार,अनमोल बिश्नोईवर 18 गुन्हे दाखल आहेत. तोही काही महिने तुरूंगात होता. 7 ऑक्टोबर 2021 रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली. पण त्यानंतर तो फरार आहे.  अनमोल बिश्नोई आपली लोकेशन्स बदलत राहतो आणि गेल्या वर्षी केनिया आणि या वर्षी कॅनडामध्ये दिसला होता.

हेही वाचा: Assembly Election 2024 | “बनसोडेंना उमेदवारी दिल्यास

14 एप्रिल 2024 रोजी सुपरस्टार सलमान खानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने गोळीबार प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात लुकआउट सर्कुलर (LOC) नोटीसही जारी केली होती.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नाव

बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचला आरोपीच्या चौकशीदरम्यान गोळीबार करणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे समोर आले होते. हत्येचा संशय असलेल्या तीन शूटर्सनी हत्येपूर्वी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी इन्स्टंट मेसेजिंग ॲप (स्नॅपचॅट) द्वारे बोलले होते. अनमोल बिश्नोई हा शूटर आणि सूत्रधार प्रवीण लोणकरच्या संपर्कात होता. अनमोल कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात होता.

हेही वाचा:  सलमान खानला धमक्या देण्यामागे नेमकं कारण काय? पोलिसांनी इंगा दाखवताच लॉरेन्स बिश्नोई घडाघडा बोलला

अनेक राज्यांमध्ये छापेमारी

जानेवारीमध्ये एनआयएच्या पथकांनी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली तसेच चंदीगडमध्ये एकूण 32 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात दोन पिस्तुल, दोन मॅगझिन आणि दारूगोळा, रोख रक्कम, कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे असा एकूण 4.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एनआयएने जानेवारीमध्ये छापेमारी केलेली प्रकरणे बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना बीकेआय आणि देशात कार्यरत असलेल्या दहशतवादी-गुंड नेटवर्कद्वारे केलेल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित आहेत. अशा कारवायांमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, स्फोटके आणि दहशत वादी हार्डवेअर जसे की IEDs यांची सीमापार तस्करी अशा प्रकारांचा समावेश आहे.  दहशतवादी हार्डवेअरचा वापर दहशतवादी संघटनांचे ऑपरेटर/सदस्य आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट देशाच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट, लक्ष्यित हत्या, खंडणी, दहशतवादी संघटनांना दहशतवादी निधी इत्यादी करण्यासाठी करत आहेत.

Web Title: Nia announces reward of rs 10 lakh on anmol bishnoi to nab lawrence bishnoi gang nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • baba Siddique
  • crime news
  • Siddhu Musewala

संबंधित बातम्या

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट…
2

उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
3

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

घरफोड्या करणाऱ्याला चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
4

घरफोड्या करणाऱ्याला चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.