गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभा हायव्होल्टेज विधानसभा होत चालली आहे. याआधी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्येदेखील बंडखोरीचा इशारा देण्यात आला आहे. महाविकास आघाडीची मोरगाव अर्जुनी विधानसभेची उमेदवारी कुठल्याही घटक पक्षाला गेली तरी चालेल. मात्र, या ठिकाणी आयात केलेला पार्सल उमेदवाराला तिकीट देऊ नये अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बंडखोरी करतील असा इशारा दिला आहे. मोरगाव अर्जुनी या विधानसभेवर माजी आमदार दिलीप बनसोडे हे काँग्रेस कडून इच्छुक आहेत. त्यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील अनेक वेळा विरोध केला आहे. मात्र आता चक्क महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीदेखील विरोध दर्शवला आहे. जर बनसोडे यांना उमेदवारी दिली आम्ही बंडखोरी करणार असा इशारा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.