Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagwane: वैष्णवी मृत्यू प्रकरणात नीलेश चव्हाण सहआरोपी; पोलिसांच्या अनेक पथकांकडून तपास सुरू

वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७ मे) गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 24, 2025 | 07:18 PM
Vaishnavi Hagwane: वैष्णवी मृत्यू प्रकरणात नीलेश चव्हाण सहआरोपी; पोलिसांच्या अनेक पथकांकडून तपास सुरू
Follow Us
Follow Us:

पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात कलम वाढ करून नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरुड, पुणे) याला देखील सहआरोपी करण्यात आले. पोलिसांकडून नीलेश चव्हाणचा शोध सुरू झाला आहे.

वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७ मे) गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ८० (२), १०८, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ११८ (१), ३ (५) प्रमाणे बावधन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर तिचे दहा महिन्यांचे बाळ नीलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले. त्यानंतर वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, नीलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली, अशी तक्रार कस्पटे कुटुंबियांनी केली. त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली. वैष्णवी हिच्या आत्महत्येनंतर दाखल केलेल्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात ही कलम वाढ केली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ या कायद्याच्या कलम ७५, ८७ प्रमाणे गुन्ह्यात कलम वाढ केली आहे.

वैष्णवी मृत्यू प्रकरणात बाप-दिराला ५ दिवसांची कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आज सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना कोर्टात हजर केले. कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर  कोर्टाने बाप-लेकाला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात सासर राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळेस कोर्टात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Vaishnavi Hagwane Case: मोठी बातमी! वैष्णवी मृत्यू प्रकरणात बाप-दिराला ५ दिवसांची कोठडी

पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्र हगवणेचे संतापजनक उत्तर

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात आज (२३ मे) सकाळी फरार आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधान पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकरणात नव्या घडामोडींचा वेग वाढला आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप सासरच्या मंडळींवर केला होता. यापूर्वीच तिचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे, आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती.

 

Web Title: Nilesh chavan co accused in vaishnavi hagwane death case pcmc crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC POLICE
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
1

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
2

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक
3

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!
4

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.