Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुलीला खूप समजावलं पण ऐकलं नाही, आता आफताबचे व्हावेत इतके तुकडे..’ श्रद्धाच्या वडिलांच्या संतापाचा बांध फुटला..

आफताबच्या कुटुंबीयांनी जरी पूर्वकल्पना दिली असती तर मुलीला वाचवता आलं असंत असंही श्रद्धाचे वडील म्हणालेत. आफताबशी मैत्री झाल्यानंतर श्रद्धा प्रॉपर्टीविषयी विचारत होती, त्यातूनच आफताब तिला कुठल्या मार्गावर घेऊन चाललाय हे दिसत होतं. असंही ते म्हणालेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Dec 23, 2022 | 05:11 PM
‘मुलीला खूप समजावलं पण ऐकलं नाही, आता आफताबचे व्हावेत इतके तुकडे..’ श्रद्धाच्या वडिलांच्या संतापाचा बांध फुटला..
Follow Us
Follow Us:

मुंबई- श्रद्धा वालकर या २७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर सगळा देश हादरला होता. तिच्या कुटुंबीयांनाही हा मोठा धक्का होता. पहिल्यांदाच श्रद्धाच्या वडिलांच्या संतापाचा बांध फुटलाय. एका टीव्ही चॅनेललला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा आफताबवरचा संताप व्यक्त केलाय. आफताब आपल्या मुलीचे इतके तुकडे करु शकतो यावर विश्वास बसत नसल्याचं ते म्हणालेत. श्रद्धा हत्येनंतर आफताबनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तो पोलिसांच्या प्रश्नांना नीटपणे उत्तरंही देत नव्हता, असंही श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलंय.

श्रद्धाच्या वडिलांची व्यथा

श्रद्धाला म्हणजेच आपल्या मुलीचा समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तरीही तिनं ऐकलं नाही, याची खंत श्रद्धाच्या वडिलांनी बोलून दाखवली. इतकंच नाही तर ज्या नराधम आफताबनं आपल्या मुलीचं ३५ तुकडे केले, त्याचे आता ७० तुकडे करायला हवेत, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केलीय. महरौलीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचे डीएन हे श्रद्धाच्या वडिलांशी जुळले असल्यानं आफताबच्या विरोधात मोठा पुरावा दिल्ली पोलिसांच्या हाती लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालावा

आफताबला बाहेरुन कुणाचातरी पाठिंबा असल्याचा संशयही श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलाय. श्रद्धाला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर आफताबसारखअया नराधमाच्या शरिराचे ७० तुकडे करण्याची गरज असल्याचंही ते म्हणालेत. असं कृत्य केलं तर काय शिक्षा मिळू शकते, याचं हे प्रकरण उदाहरण ठरावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. आफताब दिशाभूल करत होता, आता मात्र पोलिसांच्या हाती पुरावे लागले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरणं चालावं आणि आफताबला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हाही, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.

वडील म्हणून अपयशी ठरल्याची खंत

श्रद्धाचा भाऊही या प्रकरणात प्रचंड दु:खी असल्याचं त्यांनी सांगतिलंय. त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं आहे, असंही ते म्हणाले. श्रद्धाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिनं ऐैकलं नाही, असं सांगताना ते भाऊक झाले. समाज आता मुलीला समजावण्यात आपण अपयशी ठरल्याचं मानत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. आमच्या घराण्यात यापूर्वी कधी प्रसंग आला नसल्याचं ते म्हणाले. समाज या सगळ्यासाठी आपल्यालाच दोषी धरतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय.

आफताबने श्रद्धावर दबाव टाकला

कुटुंबापासून दूर होण्यासाठी आफताबनं श्रद्धावर दबाव टाकल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. सुरुवातीपासून आफताबचे यामागे प्लॅनिंग असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. आफताबच्या कुटुंबीयांनी जरी पूर्वकल्पना दिली असती तर मुलीला वाचवता आलं असंत असंही श्रद्धाचे वडील म्हणालेत. आफताबशी मैत्री झाल्यानंतर श्रद्धा प्रॉपर्टीविषयी विचारत होती, त्यातूनच आफताब तिला कुठल्या मार्गावर घेऊन चाललाय हे दिसत होतं. असंही ते म्हणालेत.

Web Title: Now aftab should be cut into pieces shraddhas fathers anger burst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2022 | 05:11 PM

Topics:  

  • Delhi Police
  • Shradha Walkar

संबंधित बातम्या

Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली
1

Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.