Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking Delhi Police Detained CJP Abhijeet Dipke: आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे रांका आणि दास यांनी १३ ऑक्टोबर रोजी तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी करत गेटवरून उडी मारून जंतर मंतरमध्ये प्रवेश केला होता. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 16, 2026 | 05:44 PM
CJP, Abhijeet Dipke, Lehra Do Tiranga, Connaught Place, Delhi Police, Sourav Das, Ashutosh Ranka,

CJP, Abhijeet Dipke, Lehra Do Tiranga, Connaught Place, Delhi Police, Sourav Das, Ashutosh Ranka,

Follow Us
Follow Us:

Delhi Police Detained CJP Abhijeet Dipke: दिल्लीतील सेंट्रल पार्क परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या  लेहरा दो तिरंगा रॅलीपूर्वीच सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नसतानाही हे आंदोलन बोलण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. सीजेपीने आज लेहरा दो तिरंगा रॅली बोलवली होती.  सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेविरोधात ही रॅली काढण्यात येणार आहे. जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्याचा आरोपात सौरव आणि आशुतोष यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. याविरोधात ही रॅली काढली जाणार आहे.

#WATCH | Delhi | CJP Founder Abhijeet Dipke detained by Delhi Police CJP has called for ‘Lehra Do Tiranga’ protest at Central Park in Connaught Place today. Section 163 is in effect in Connaught Place and no permission has been granted by the NDMC for the Tiranga Yatra https://t.co/J7J0IqsUjH — ANI (@ANI) October 16, 2026 CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी आयसा ची राष्ट्रीया अध्यक्षा नेहा बोरा यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना मंडी हाऊसजवळ ताब्यात घेण्यात आले. त्या मंडी हाऊसपासून सेंट्रल पार्कच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न करत होत्या. नेहा बोरा यांना ताब्यात घेत असताना आयसाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना ताब्यात

अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतरही  सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे. सीजेपी आणि आयसाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज हाती घेऊन तिरंग रॅली सुरू केली आहे. तुम्ही आम्हा दोघांना ताब्यात घेतलं असलं तरी हा मोर्चा आणि आमचे आंदोलन थांबवू कत नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया नेहा बोरा यांनी दिली आहे.

या आंदोलनाला आम आदमी पार्टी आणि डाव्या विद्यार्थी संघटना आयसा (AISA) व एसएफआय (SFI) यांचाही पाठिंबा मिळत आहे. सीजेपीच्या तिरंगा मार्चच्या घोषणेनंतर, कनॉट प्लेस परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी सूचना जारी केली आहे.

CJP Lehra Do Tiranga: ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलन; जंतरमंतरसह कॅनॉट प्लेस परिसरात दिल्ली-मुंबईत हायअलर्ट

आपने कार्यालयासमोर तिरंगा फडकवून मोर्चाला सुरुवात

दिल्ली आपचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज म्हणाले, “‘तिरंगा यात्रा’ पुकारण्यात आली आहे आणि आम्ही शेकडो तिरंग्यांसह पूर्णपणे तयार आहोत. आज आम्ही मध्य दिल्लीच्या विविध भागांमध्ये राष्ट्रध्वज फडकवणार आहोत. आज सकाळी आमच्या युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती भवन आणि संसदेसमोर २७० फूट लांबीचा तिरंगा फडकवला.” यानंतर, सर्व आप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयासमोर तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली, जिथून त्यांनी कनॉट प्लेसच्या दिशेने मोर्चा काढला.

Web Title: Delhi police detained cjp abhijeet dipke lehra do tiranga rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Delhi Police

संबंधित बातम्या

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट
1

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
2

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी
3

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
4

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.