Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट

Tiranga March : कॉकरोच जनता पार्टीने जाहीर केलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांच्या घरी धडक दिली आहे. कॅनॉट प्लेस परिसरात कडेकोट बंदोबस्त असून आंदोलनाला परवानगी मिळणार की दीपके यांना अटक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 16, 2026 | 03:39 PM
Supreme Court, CJP, Connaught Place, Abhijeet Dipke, CJI, Legal News, National Politics,

Supreme Court, CJP, Connaught Place, Abhijeet Dipke, CJI, Legal News, National Politics,

Follow Us
Follow Us:
  • तिरंगा मार्चपूर्वी अभिजीत दीपके यांच्या घरी दिल्ली पोलीस
  • संध्याकाळी 5 वाजता कॅनॉट प्लेसमध्ये आंदोलन
  • दिल्ली पोलिसांचा हाय अलर्ट; कॅनॉट प्लेस परिसरात निर्बंध
 

Tiranga March : दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीने जाहीर केलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आज, 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता कॅनॉट प्लेस परिसरात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांच्या घरी पोहोचल्याने आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘लहरा दो तिरंगा’ या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांचे सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना तिरंगा फडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचं पथक दीपके यांच्या घरी दाखल झालं. सुमारे 15 ते 20 पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून त्यांना अटक केली जाणार की काही अटी घालून आंदोलनाला परवानगी दिली जाणार, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. दीपके यांनी यापूर्वीच आपल्याला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट; सेंट्रल पार्क बंद

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी आंदोलनाच्या ठिकाणापासून दूर राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू केल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय, प्रशासकीय कारणास्तव 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश दिल्ली महापालिकेकडून जारी करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

दरम्यान, सेंट्रल पार्कमधील प्रस्तावित आंदोलनाला विरोध करत काही व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

आता अभिजीत दीपके यांच्याबाबत दिल्ली पोलीस काय निर्णय घेतात आणि नियोजित तिरंगा मार्च होणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

CJP Lehra Do Tiranga: ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलन; जंतरमंतरसह कॅनॉट प्लेस परिसरात दिल्ली-मुंबईत हायअलर्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॉकरोच जनता पार्टीचा तिरंगा मार्च कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं आहे.

  • Que: दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांच्या घरी का पोहोचले?

    Ans: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असून त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे.

  • Que: तिरंगा मार्चविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

    Ans: हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Web Title: Cockroach janta party tiranga march abhijeet dipke delhi police vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • Delhi Police

संबंधित बातम्या

CJP Protest In Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ CJP च्या वतीने ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
1

CJP Protest In Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ CJP च्या वतीने ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन

Abhijeet Deepke : ‘त्या भाजपच्या बाजूने बोलू शकतात पण…’ इम्रान खानच्या नोटिशीवर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया
2

Abhijeet Deepke : ‘त्या भाजपच्या बाजूने बोलू शकतात पण…’ इम्रान खानच्या नोटिशीवर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

Dhruv Rathee : ध्रुव राठीविरोधात सरकारचा नवा डाव? 2018 च्या ‘त्या’ प्रकरणाची फाईल उघडली, कोर्टाकडून समन्स जारी
3

Dhruv Rathee : ध्रुव राठीविरोधात सरकारचा नवा डाव? 2018 च्या ‘त्या’ प्रकरणाची फाईल उघडली, कोर्टाकडून समन्स जारी

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप
4

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.