Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: भर चौकात अश्लील वर्तन; गौरव आहुजाच्या कोठडीत वाढ, पोलिसांनी पंचनाम्यासाठी थेट…

गौरव व भाग्येश दोघे मित्रांनी मध्यरात्री पार्टी केली. नंतर आलिशान कारने जाताना गौरवने शास्त्रीनगर चौकाच्याच सिग्नलला रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून रस्त्यावरच लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2025 | 09:53 PM
Pune Crime News: भर चौकात अश्लील वर्तन; गौरव आहुजाच्या कोठडीत वाढ, पोलिसांनी पंचनाम्यासाठी थेट...

Pune Crime News: भर चौकात अश्लील वर्तन; गौरव आहुजाच्या कोठडीत वाढ, पोलिसांनी पंचनाम्यासाठी थेट...

Follow Us
Follow Us:

पुणे;आलिशान कार सिग्नलला थांबवून रस्त्यावरच लघुशंका करणारा तसेच हटकल्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसांची वाढ केली. तर, शेजारी बिअरची बॉटल हातात घेऊन बसलेला भाग्येश ओसवालची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तत्पुर्वी पोलिसांनी गौरवला तपासासाठी जिथे लघुशंका केली, त्याचठिकाणी पुन्हा पायी चालवत नेले आणि गुन्ह्याचा पंचनामा केला. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) याला एक दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. मार्केट यार्ड) याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे, (भारतीय न्यायसंहिता कलम २७०, २८१, २८५, ७९, महाराष्ट्र पोलीस कायदा १८४, १२२, तसेच दारूबंदी कायद्यान्वये ६५, ८५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव व भाग्येश दोघे मित्रांनी मध्यरात्री पार्टी केली. नंतर आलिशान कारने जाताना गौरवने शास्त्रीनगर चौकाच्याच सिग्नलला रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून रस्त्यावरच लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणात पोलिसांनी गौरवला अटक केली. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनेतील गाडी जप्त केली आहे.

परंतु, गाड्याच्या नंबरप्लेट काढून ठेवण्यात आलेल्या आहेत. आरोपी गौरवरचा मोबाईल जप्त करायचा असून, त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर, आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गौरवच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली. तर भाग्येश याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जिथे घडलं पुन्हा तिथे..!
गौरवने दारूच्या नशेत तसेच श्रीमंतीचा माज दाखवत ज्याठिकाणी लघुशंका केली होती, त्याचठिकाणी पोलिसांनी सोमवारी गौरव आणि भाग्येश या दोघांना तपासासाठी नेले. गुन्ह्याचा पंचनामा करण्यात आला. दोघे आलिशान कारने त्याठिकाणी उभा होते. पण, आज चेहऱ्यावर काळा कपडा टाकून पोलिसांनी हाताला धरून त्यांना पायी चालवत याठिकाणी आणले होते. त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी देखील झाली होती.

दरम्यान, गौरव अहुजाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीने गौरवच्या माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.  व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “नमस्कार, मी गौरव अहुजा, राहणार पुणे. माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य घडले ते अत्यंत चुकीचे होते. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस विभाग आणि शिंदे साहेब यांची मी माफी मागतो. कृपया मला माफ करा आणि मला एक संधी द्या. तसेच, मी पुढील आठ तासांत येरवडा पोलिसांसमोर हजर होणार आहे. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना त्रास देऊ नका.” आता येरवडा पोलीस या प्रकरणात पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Obscene behavior accused gourav ahuja custody increase by court pune police panchnama about that yerwada crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त
1

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक
2

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान
3

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान

Pune News : पुण्यात तिसऱ्या दिवशीच रोखला ‘बुलडोझर’; व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे अतिक्रमण कारवाई थांबली
4

Pune News : पुण्यात तिसऱ्या दिवशीच रोखला ‘बुलडोझर’; व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे अतिक्रमण कारवाई थांबली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.