
crime (फोटो सौजन्य: social media)
कसा उघडकीस आला प्रकार?
ओडिशा दक्षता विभागाने शनिवारी कंधमाल जिल्ह्यातील बालिगुडा येथील आयटीडीएमध्ये कार्यरत असलेले एईई बैकुंठनाथ बेहरा यांच्या ९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. भुवनेश्वर, जाजपूर, बारीपाडा आणि बालिगुडा येथील नऊ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अनेक वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते. बैकुंठनाथ बेहरा यांच्या विरोधात यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली.
काय काय आढळलं?
अधिकाऱ्यांना अनेक मोठी आणि महागडी घरे आढळून आली. आतापर्यंत पाच बहुमजली इमारती उघडकीस आल्या आहेत. यामध्ये भुवनेश्वरच्या नीलाद्री विहारमधील सुमारे १०,५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या चार मजली घराचा समावेश आहे. शैलाश्री विहार, कानन विहार, चंद्रशेखरपूर आणि जाजपूरच्या धर्मशाळा परिसरातही घरे आढळून आली.
१३ वेगवेगळे भूखंड
एवढेच नाही तर १३ वेगवेगळे भूखंडही उघडकीस आले. यापैकी सात भूखंड भुवनेश्वरच्या प्रमुख भागांमध्ये आहेत. या सर्व मालमत्तांचे बाजारमूल्य खूप जास्त असल्याचे सांगितले जात असून त्याचे मूल्यांकन केले जात आहे. सुरुवातीला अंदाजे २,६६,००० रुपये रोकड जप्त करण्यात आली होती, मात्र बँकेच्या लॉकरच्या झडतीतून अंदाजे २ कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आले. सध्या आणखी दोन लॉकरमध्ये तपास सुरू आहे.अधिकाऱ्यांची पथके सोन्याचे दागिने, बँक ठेवी, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आणि इतर आर्थिक गुंतवणुकींचीही चौकशी करत आहेत. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य मोजण्याचे काम तांत्रिक पथक करत आहे.
६००० पगाराने सुरुवात
बैकुंठनाथ बेहरा यांनी १९९९ मध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, तेव्हा त्यांचा पगार सुमारे ६,००० रुपये होता. कालांतराने, त्यांना एईई (AEE) पदावर बढती मिळाली, परंतु त्यांच्या संपत्तीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे तपास यंत्रणांना संशय आला आहे.
Pune Crime: खाकी वर्दीचा रुबाब महागात; अपॉइंटमेंटसाठी महिला बनली PSI! तोतया महिला पोलिस जेरबंद
Ans: एईई बैकुंठनाथ बेहरा यांच्यावर छापेमारी करण्यात आली.
Ans: ५ आलिशान घरे, १३ भूखंड आणि २ कोटी रुपये रोख रक्कम आढळून आली.
Ans: त्यांनी १९९९ मध्ये सुमारे ६ हजार रुपये पगारावर नोकरी सुरू केली होती.