Pune police raid: डीजेचा दणदणाट अन् मद्याची धुंदी; सोशल मीडियावरून जमलेल्या हायप्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश
Pune Crime News: तुळापूर तस खेडगाव… आजूबाजाला पूर्ण शेती… तिथे टुमूकदार एक खासगी बंगलो (फार्महाऊस)… हे गाव तस खेडेगाव असल्याने गावकरी गाड झोपेतच होते… पण तिथच बंद बंगलोत डीजेच्या दणदणाटात अन् लाईट्सच्या झगमगाटात मद्याच्या धुंदीत तरुणाई झिंगाट डान्स अन् मद्याचे प्याले रिचवत ‘प्रोजेक्ट एक्स’ हाऊस पार्टी करत होते. मात्र, ही खबर पुणे पोलिसांना मिळाली अन् छापा कारवाईची मोहिम सुरू झाली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’चे आयोजन केले गेले होते. पार्टीचे पोस्टरच सामान्यांना ठोका चुकवणारे होते. पोस्टरवर पार्टीचे नाव अन् एक तरुण उलटा पडल्याचे दाखविले गेले होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहचलेल्या या पार्टीचे लोकेशन ऐनवेळी सांगण्यात आले. तरीही हे तरुण इतक्या मोठ्या प्रमाणात या पार्टीत सहभागी झाले होते.
पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाऊस पार्टीची माहिती शनिवारीच मिळाली होती. वरिष्ठांनी अवघ्या काही तासात या कारवाईचे प्लॅनिंग सुरू केले. एक पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक आणि पावणे दोनशे कर्मचाऱ्यांचा फौजफाटा नेमण्यात आला. पोलिसांनी मध्यरात्री एकाठिकाणी सर्व वाहने आणि कर्मचारी एकत्रित केले आणि एकाचवेळी गाड्यांमधून मध्यरात्री अडीचच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. प्रथम फार्महाऊसला पोलिसांनी वेडा घातला. निम्मे कर्मचारी बाहेर थांबले. वरिष्ठ अधिकारी आणि काही महिला कर्मचारी व पुरूष कर्मचारी यांनी थेट आत शिरले आणि पार्टीचा पर्दाफाश झाला.
पुणे पोलिसांनी दिवसभर याप्रकरणात कारवाई सुरू ठेवून नेमके कोणी आयोजन केले, लाईट्स कोणाचे, साऊंड सिस्टीम कोण पुरवली तसेच फार्महाऊस मालक यांच्यासह दारू सव्ह करणारे, बाऊन्सर, लाईट्स व साऊंड सिस्टीमचे मालक व कामगार या सर्वांवर गुन्हा नोंद केला. यातील काहीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-यांनी दिली..
आत शिरताच लाईट्सचा झगमगाट, डीजेचा दणदणाट तर तरुणाईचा डान्स, हुक्याचे धुर आणि झिंगाट दृष्य भयावहच होते, अशी प्रतिक्रिया एका पोलिसाने दिली. दुसरीकडे पोलिस साध्या वेशात असल्याने येथील आयोजकांसह तरूणांनाही नेमक कोण आलय आणि काय झाले हेच समजत नव्हते. पोलिसांनी डीजे बंद केला. तरुणांना पोलिसांची रेड झाल्याचे समजल्याने एकच गोंधळ उडाला.
हाऊस पार्टीचे आयोजन करणाऱ्या सात जणांनी इन्स्टासह इतर सोशल मिडीयावर याची माहिती दिली. पण, हाऊस पार्टी नेमकी कुठे हे ‘ओपन केले नाते, ते ऐनवेळी सांगितले जाईल, असे सांगितले शनिवारी पार्टीच्या ५ तासांपूर्वी या पार्टीचे लोकेशन सोशल मिडीयावर टाकण्यात आले. सर्वांना ही पार्टी तुळापूर येथील फार्महाऊसवर असल्याचे समजले,
गेल्या काही वर्षांत पुणे आणि उपनगरांसह शहराच्या बाहेरील परिसरात फार्महाऊस, रिसॉर्ट, खासगी बंगल्यांवर पाल्यांचे आयोजन केले जात आहे. या पाल्यांमध्ये गांजा, मद्य आणि हुक्क्यांचा सर्रास वापर होत असल्याच्या घटना सातत्याने उघड होत आहेत. पाट्यांचे आयोजनानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहचवले जात आहे.
हाऊस पार्टीत हुक्का तसेच दारूचा पुरवठा करण्यात येत होताच, पण पोलिसांच्या छाप्यात ३ ग्रॅम गांजा देखील मिळून आला. तर हुक्क्यात देखील प्रतिबंधित असलेले काही फ्लेवर पोलिसांना मिळाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या पार्टीचे नियोजन असण्याचा पोलिसांना अंदाज आहे. पार्टीत दारूचा परवाना घेतला गेला होता. तर लाईट्स, साऊंड सिस्टीम अशी सर्व व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती.






