Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकूने भोसकून एकाची हत्या; सात वर्षांनी कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा

रोपी रोहिदास सावंत याने दारूच्या नशेत त्या ठिकाणी येऊन भातात आमटी का वाढत नाही, असे म्हणून भांड्यातील आमटी ओतली. त्यावेळी तेथीलच महेश पवार यांनी त्यास अटकाव केला असता, त्याच्याशी रोहिदास सावंतने बाचाबाची केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2025 | 01:40 PM
अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास

अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास

Follow Us
Close
Follow Us:

कराड : किरकोळ कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कराड न्यायालयाचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी एकास जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

रोहिदास बाळकृष्ण सावंत (रा. चिंचणी, ता. कराड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, 24 जुलै 2018 रोजी चिंचणी (ता. कराड) येथील वरदायिनी देवीच्या मंदिरात गावकऱ्यांनी भंडारा आयोजित केला होता. या भंडाऱ्यात भात-आमटीचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी आरोपी रोहिदास सावंत याने दारूच्या नशेत त्या ठिकाणी येऊन भातात आमटी का वाढत नाही, असे म्हणून भांड्यातील आमटी ओतली. त्यावेळी तेथीलच महेश पवार यांनी त्यास अटकाव केला असता, त्याच्याशी रोहिदास सावंतने बाचाबाची केली.

हेदेखील वाचा : Delhi crime: पत्नीने चेहऱ्यावर टाकले उकळते तेल, नंतर जखमांवर टाकली मिरची पूड आणि…; पहाटे घडलं धक्कादायक प्रकरण!

यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून सावंतला घरी पाठवले. मात्र, तासाभरानंतर रोहिदास सावंत हा चाकू घेऊन त्या ठिकाणी आला आणि महेश पवार यास शिवीगाळ करू लागला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तेथीलच अमोल अशोक पवार (वय ३४) हा रोहिदास सावंतला समजावून सांगत असताना सावंतने ‘तुला आणि तुझ्या भावाला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणून अमोल पवारवर चाकूने वार केले. त्यावेळी महेश पवारमध्ये आला असता, तोही चाकूच्या वाराने जखमी झाला.

यानंतर गंभीर जखमी झालेल्या अमोल पवारला कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, 27 जुलै 2018 रोजी अमोल पवारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

कराड न्यायालयात चालला खटला

खटल्याचे कामकाज कराड न्यायालयाचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल. जोशी यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी काम पाहिले त्यांनी या खटल्यात 21 साक्षीदार तपासले आणि जोरदार युक्तिवाद केला. त्याचवेळी काही खटल्यांचे प्रमाण देखील न्यायालयासमोर मांडले. न्या. जोशी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी ग्राह्य मानून आरोपी रोहिदास बाळकृष्ण सावंत खून प्रकरणी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

Web Title: One gets life sentence for stabbing to death decision by karad court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Court Decision
  • crime news
  • Karad news

संबंधित बातम्या

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई
1

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?
2

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार
3

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
4

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.