Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

विनोदने आपल्या साथीदारांसह आरोपी प्रशांतच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या वडिलांना काठ्यांनी मारहाण केली. त्याच्याविरूद्ध आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विनोद हा आरोपीच्या गावी जायचा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 22, 2025 | 03:12 PM
पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता जुन्या वादातून विनोद देशमुख (रा. मशीतोला, घाटेटेमणी) या व्यक्तीची तलवारीने वार करून दोन आरोपींनी हत्या केली. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात खुनातील आरोपींना अटक केली.

प्रशांत ऊर्फ लोकेश छनूलाल कावडे (२५) आणि कामेश चुन्नीलाल कवडे (२८, दोन्ही रा. गिरोला, ता. आमगाव) अशी आरोपींची नावे आहेत. देशमुख मंगळवारी (दि. १९) आपल्या फार्म हाऊसवर गेले होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. बुधवारी (दि. २०) त्यांची पत्नी आणि गावकरी त्यांचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्रात गेले होते. जिथे त्याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी हिरकणी विनोद देशमुख हिच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि हवालदारांच्या ३ पथकांची नियुक्ती केली. गुन्ह्याची माहिती घेतली. त्यांनी परिसरातील लोकांकडून घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींची माहिती गोळा केली आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी अथक प्रयत्न केले. यादरम्यान, आरोपी प्रशांत कावडे आणि कामेश कावडे यांना कालीमाटी गावातून ताब्यात घेतले.

दरम्यान, या सर्वांची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दोन्ही आरोपींना रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे यांच्या पथकाने केली.

वडिलांना केली लाठ्या-काठ्यांनी मारहाण

विनोदने आपल्या साथीदारांसह आरोपी प्रशांतच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या वडिलांना काठ्यांनी मारहाण केली. त्याच्याविरूद्ध आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विनोद हा आरोपीच्या गावी जायचा. तेथे त्याची वीटभट्टी आहे. त्यामुळे तेथे त्याचं येणं-जाणं सुरु होते.

विनोद गावात जाताच द्यायचा धमकी

विनोद गावात गेल्यावर तो दोन्ही आरोपींना शिवीगाळ करून धमकी द्यायचा. याच कारणावरून दोन्ही आरोपींनी 4-5 दिवसांपूर्वी विनोदच्या हत्येचा कट रचला आणि मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गिरोला ते मशीटोला या पक्क्या रस्त्यावर त्याला थांबवून चेहऱ्यावर तिखट फेकले. त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि मानेवर लोखंडी तलवारीने हल्ला केला होता.

Web Title: One killed with sword due to past enmity incident in gondia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • crime news
  • gondia news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!
2

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल
3

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
4

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.