Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लिफ्टच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2025 | 01:17 PM
दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दसऱ्याच्या सणाच्या गडबडीत चोवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीत बुधवारी (दि.२ ऑक्टोबर) संध्याकाळी लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लिफ्टच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सायंकाळच्या सुमारास राम स्मृती सोसायटीच्या इमारतीतील लिफ्ट तिसऱ्या व चौथ्या मजल्यादरम्यान अचानक बिघाड होऊन थांबली. त्याच वेळी लिफ्टमध्ये एकटाच असलेला १२ वर्षीय मुलगा दरवाज्यात अडकला. दरवाजा अचानक उघडल्याने तो फसला व गंभीर जखमी झाला. याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. जवानांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर मुलाला लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

लिफ्टमध्ये अडकल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

परिसरात हळहळ

दसऱ्याच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेने पाणी फेरले असून, संपूर्ण चोवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेजारी व सोसायटीतील रहिवाशांनी ही घटना टाळता आली असती का, असा सवाल उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेनंतर सोसायटीतील लिफ्टच्या देखभाल व सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लिफ्टमध्ये नेमका काय बिघाड झाला? नियमित देखभाल केली जात होती का? सुरक्षेचे निकष पाळले गेले होते का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात पोलिस व संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. दरम्यान, रहिवाशांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Web Title: One person died after being trapped in an elevator in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • Pimpri Chinchwad
  • Pimpri Chinchwad crime

संबंधित बातम्या

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
1

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
2

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
3

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.