Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा हद्दीतील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (दि. 7) पहाटे झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 11:48 AM
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/सतिश गाडे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा हद्दीतील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (दि. 7) पहाटे झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इतक्या जोरात धडक दिली की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी आयशर टेम्पो चालक कुलदीप बाबुराव पवार यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अपघातात तुषार वामन भूमकर (वय 38, रा. भूमकर चौक, वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमित भाटे, प्रदीप भुसारे, पंकज पाटील आणि प्रसाद विनोदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, MH-14 MG-0007 क्रमांकाची फॉर्च्युनर कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंक बोगद्यात पुढे जाणाऱ्या MH-01 CR-7075 क्रमांकाच्या आयशर टेम्पोला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज बोगद्यात घुमला आणि काही क्षणांतच घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक चमन शेख, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शिखरे, पोलीस अंमलदार अंकुश पवार, तेलंग व सहकाऱ्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

या भीषण धडकेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉर्च्युनर कारचा वेग, चालकाचे नियंत्रण आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू असून लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Web Title: One person died in a horrific accident on the mumbai pune missing link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

Miraj Slab Collapse: मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी
1

Miraj Slab Collapse: मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती
2

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
3

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.