एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आबान अहमद आणि त्याचा मित्र सोनू यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक तपासात चालकाला पहाटेच्या वेळी झोपेची डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. झाशीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांनीही कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले असून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आबानचा मोठा भाऊ अली अहमद याला १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रयागराजच्या नैनी कारागृहातून झाशी कारागृहात हलविण्यात आले होते. त्याला भेटण्यासाठी जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला. एकेकाळी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अतीक अहमदच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांत एकामागोमाग एक संकटे कोसळली आहेत. अतीक अहमद आणि त्याची पत्नी शाइस्ता परवीन यांना पाच मुले होती. त्यापैकी आता दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुले कारागृहात आहेत. कुटुंबातील काही सदस्य अद्याप फरार असल्याने अतीक अहमदचे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र समोर आले आहे.
अतीक अहमदचे वडील, हाजी फिरोज, अलाहाबादमध्ये घोडागाडी चालवत असत. अतीक अभ्यासात कच्चा होता आणि लवकरच त्याने शाळा सोडली. श्रीमंत होण्याच्या ध्येयाने त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. १९७९ मध्ये, वयाच्या १७ व्या वर्षी, अतीकवर पहिल्यांदा खुनाचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळी अलाहाबादमध्ये ‘चांद बाबा’ नावाच्या गुंडाला अतीकची दहशत होती. चांद बाबामुळे पोलीस आणि राजकारण्यांना त्रास होत होता. अतीकने या संधीचा फायदा घेतला आणि पोलीस व राजकारण्यांच्या पाठिंब्याने चांद बाबाचा खून केला. यानंतर, अतीक अहमद रातोरात अलाहाबादचा नवा ‘डॉन’ बनला.
भारतीय डेटा सेंटर्सना मोठा दिलासा; परदेशी कंपन्यांसाठी अनुपालन प्रक्रिया होणार अधिक सोपी






