Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कात्रज घाटात भीषण अपघात, बस-रिक्षाची समोरासमोर धडक; चालकाचा जागीच मृत्यू

कात्रज घाटात जुन्या बोगद्याजवळ बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2026 | 12:05 PM
कात्रज घाटात भीषण अपघात, बस-रिक्षाची समोरासमोर धडक; चालकाचा जागीच मृत्यू

कात्रज घाटात भीषण अपघात, बस-रिक्षाची समोरासमोर धडक; चालकाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अपघातामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कात्रज घाटात जुन्या बोगद्याजवळ बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

 

हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२ वर्षे, रा. सुखसागर नगर, बनकर शाळेजवळ, बिबवेवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अपघातात राजेश इंगवले (वय ४८ वर्षे, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रस्ता), दशरथ निरगुडे (वय ४३ वर्षे, रा. अप्पर बिबवेवाडी) आणि शहाजी लक्ष्मण शिवदे (वय ४१ वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर राज्य परिवहन महामंडळाची बस स्वारगेटवरून सांगली जिल्ह्यातील विटा येथे जात होती. तर तीन प्रवाशांना घेऊन रिक्षा खेड शिवापूर येथून स्वारगेटच्या दिशेने येत होती. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास जुन्या बोगद्यात रिक्षा आणि बसची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रिक्षा चालक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय ५३ वर्षे, रा. शेडगेवाडी, खानापूर, जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांची ‘गॅस’कोंडी! बुकिंग करूनही सिलिंडरचा पत्ता नाही; वितरण व्यवस्था कोलमडली

मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: One person has died in a horrific accident at katraj ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त
1

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त
2

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
3

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
4

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.