Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर-रामबाग मार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

भोर- रामबाग रस्त्यावर नवलाई मंदिराजवळ मंगळवारी (दि.५) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एसटी बस आणि इको कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 04:48 PM
भोर-रामबाग मार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

भोर-रामबाग मार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

भोर : भोर- रामबाग रस्त्यावर नवलाई मंदिराजवळ मंगळवारी (दि.५) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एसटी बस आणि इको कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भोर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

भोर- दुर्गाडी- भोर ही एसटी बस (एमएच ०६ एस ८२९४ ) भोर डेपोच्या दिशेने येत होती. याच वेळी भोरकडून रामबागकडे जाणारी इको कार (एमएच ०५ सीएम ५७५२) नवलाई मंदिराजवळील वळणावर आली असता, दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, इको गाडीच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. चालक बाजूला बसलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. इको गाडीत अडकलेल्या जखमींना पत्रे कापून बाहेर काढावे लागले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.

वाहतूक एक तास विस्कळीत

घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भोर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ मारुती घारे (वय ५५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात घारे यांचे नातेवाईक संजय चाळके, नात गाथा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: One person has died in a horrific accident involving an st bus and a car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
4

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.