Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळाचा घाला! भरधाव बसची ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरात भरधाव बसने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला दिलेल्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2025 | 04:18 PM
हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर

हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरात भरधाव बसने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला दिलेल्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जयंत भामरे (वय ६३, रा. ग्रीनवुड्स, मांजरी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अपघातात भामरे यांची पत्नी वैशाली गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत भामरे यांची मुलगी प्रियांका (वय २८) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, बस चालक संजय उज्जैनराव दिंडे (वय ४६, रा. संतकृपा सोसायटी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भामरे दाम्पत्य शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. शेवाळवाडी भाजी मंडईजवळ रस्ता ओलांडणाऱ्या भामरे दाम्पत्याला भरधाव बसने धडक दिली. अपघातात जयंत आणि त्यांची पत्नी वैशाली जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना ताताडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच जयंत यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : केअर टेकरकने मनोरुग्ण महिलेवर केला अत्याचार; पुण्यातील संतापजनक प्रकार

दीर- भावजयचा मृत्यू

पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महिला पोलिसाला कारने उडवले

राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One person has died in pune after being hit by a speeding bus nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • Bus Accident
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
1

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
2

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
3

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
4

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.