Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Nana Patekar: गेल्या वर्षभरापासून नानांकडे मजूर म्हणून काम करणारे विठ्ठल पाजगे म्हणाले, नानांचा स्वभाव अत्यंत चांगला होता. आम्ही त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होतो; मात्र त्यांनी कधीही मालक-मजूर असा भेद केला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 06:29 PM
नाना पाटेकर यांचे निधन

नाना पाटेकर यांचे निधन

Follow Us
Follow Us:
  • गोव्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे दु:खद निधन 
  • थोड्याच वेळात पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार 
  • शेतीची आवड, साधी राहणी अन् गरिबांशी जिव्हाळ्याचे नाते
पुणे/Nana Patekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न करूनही त्यांच्या हृदयाची हालचाल पुन्हा सुरू होऊ शकली नाही. पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ‘नाना’ मात्र फॉर्महाऊसवर आले की पूर्णपणे शेतकरीच (Entertainment) होऊन जायचे. अंगात साधा कुर्ता, डोक्यावर टोपी, खांद्यावर टॉवेल आणि हातात शेतातील भाजीपाला… त्यांच्या या साधेपणामुळे शेजारी-पाजारी आणि शेतमजुरांना ते कधीच सेलिब्रिटी वाटले नाहीत. ‘आपल्यातलाच एक माणूस’ अशीच त्यांची ओळख परिसरात होती.
नानांच्या फॉर्महाऊसवर गेल्या दोन वर्षांपासून शेतीला पाणी देण्याचे काम करणारे दिनकर जाधव मूळचे धाराशिव जिल्ह्यातील. नानांनीच त्यांना कामावर ठेवले होते. “गरीबांना नाना खूप चांगले होते. गरिबांची ते कायम काळजी घ्यायचे,” असे सांगताना जाधव यांचा स्वर भावूक झाला. नानांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी जाधव शेतातील सागवानाची वाळलेली लाकडे घेऊन आले होते. “ही शेतात जमा झालेली वाळलेली लाकडे आहेत. नानांनी ती जमा केलेली नाहीत. सागवानाची लाकडे असल्याने ती येथे आणण्यास सांगितले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

गेल्या वर्षभरापासून नानांकडे मजूर म्हणून काम करणारे विठ्ठल पाजगे म्हणाले, “नानांचा स्वभाव अत्यंत चांगला होता. आम्ही त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होतो; मात्र त्यांनी कधीही मालक-मजूर असा भेद केला नाही.”

सकाळच्या फेरफटक्यात प्रत्येकाची विचारपूस

शेजारच्या फॉर्महाऊसवर काम करणारे गिरीश निंबाळे यांच्या आठवणीही नानांच्या साधेपणाची साक्ष देतात. “नाना सकाळी फॉर्महाऊसपासून पायगुडेवाडी फाट्यापर्यंत चालत जायचे. वाटेत एखादा ज्येष्ठ नागरिक दिसला की थांबून त्यांची विचारपूस करायचे. मोठा अभिनेता असल्याचा आविर्भाव त्यांनी कधीच केला नाही,” असे निंबाळे यांनी सांगितले.
नानांना स्वतः स्वयंपाक करण्याचीही विशेष आवड होती. शेतातील भाजीपाला स्वतः तोडून आणायचा आणि त्याच भाज्यांचा स्वयंपाक करायचा, अशी आठवण निंबाळे यांनी सांगितली. पुणे किंवा परिसरातील कामासाठी ते स्वतः वाहन चालवत जात. दूरचा प्रवास असेल, तरच चालक सोबत असायचा.

शेतात फेरफटका अन् ताज्या भाज्यांचा स्वयंपाक

नानांच्या शेतीत काम करणारे नितीन राऊत यांनी त्यांच्या शेतीप्रेमाची आठवण सांगितली. “नानांना शेतीची प्रचंड आवड होती. शेतात विविध प्रकारच्या भाज्या आणि फळझाडांची त्यांनी लागवड केली होती. सकाळ-सायंकाळ ते शेतात फेरफटका मारायचे. ताज्या भाज्या आणि फळे स्वतः तोडून आणायचे. त्याच ताज्या भाज्यांचा घरात स्वयंपाक केला जायचा,” असे राऊत म्हणाले.

राज्यातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक अभिनेते नानांच्या फॉर्महाऊसवर येत असत. मात्र या वावराचा त्यांच्या साधेपणावर कधीही परिणाम झाला नाही. गावातील लग्नसमारंभ असो अथवा स्थानिक कार्यक्रम, नाना आवर्जून हजेरी लावत. परिसरातील गोरगरिबांना मदतीचा हात देत असल्याने ते सर्वांचेच ‘आपले’ झाले होते.

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

रुपेरी पडद्यावरील नाना आज आठवणीत; मात्र फॉर्महाऊसवरील ‘आपला माणूस’ कायम मनात
नानांच्या निधनानंतर त्यांच्या फॉर्महाऊसवर काम करणाऱ्या हातांमध्ये आज कामाची लगबग नसली, तरी त्यांच्या आठवणींची गर्दी आहे. अभिनयाच्या क्षेत्रात मोठी उंची गाठूनही मातीशी आणि माणसांशी जोडलेले नाते त्यांनी अखेरपर्यंत जपले. त्यामुळेच शेतमजुरांच्या आठवणीतला ‘नाना’ हा अभिनेता नसून आपुलकीने हाक मारणारा, सुख-दुःखात धावून जाणारा आणि शेताच्या मातीत रमणारा आपलाच माणूस आहे.

Web Title: Donje farm house peoples emotional statement after nana patekar passed away in goa entertainment news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Nana Patekar
  • pune news

संबंधित बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
1

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
2

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
3

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
4

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.