Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: ‘ऑपरेशन शोध’ अंतर्गत 330 महिला, मुली, बालकांचा छडा

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात महिला, मुली आणि बालके यांच्याबाबत बेपत्ता (मिसिंग) झाल्याची नोंद आहे, मात्र, त्यांचा शोध लागतोच असे नाही. जिल्हा पो लीस दलाने आता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घ

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2025 | 05:18 PM
'ऑपरेशन शोध' अंतर्गत 330 महिला, मुली, बालकांचा छडा (फोटो सौजन्य-X)

'ऑपरेशन शोध' अंतर्गत 330 महिला, मुली, बालकांचा छडा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई:- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून हरवलेल्या महिला, पुरुष तसेच बालकांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ राबवण्यात आले होते. या ऑपरेशन दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी महिला, पुरुष, अपहरण झालेले मुलं व मुली अश्या एकूण 330 जणांचा शोध घेतला आहे.

पोलीस महासंचालक यांनी महाराष्ट्र राज्यातील हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात विशेषतः १ वर्ष उलटुन गेलेल्या महिलांच्या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालुन महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन शोध” हि विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय स्तरावर “ऑपरेशन शोध” साठी पोलीस ठाणे स्तरावर एकूण २० पथके व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील २ पथके तयार करण्यात आली होती.

खुनाच्या उद्देशाने अपहरण केलेल्या व्यापाराची 24 तासात सुटका, वाशिममधून तिघांना अटक तर व्यापारी सुखरूप

तसेच बाल कल्याण समिती, कर्जत, ठाणे, उल्हासनगर, अधीक्षक, बाल निरीक्षण गृह, रायगड, ठाणे, त्याचबरोबर नवी मुंबई आयुक्तालयातील विविध एनजीओ यांच्याशी समन्वय साधुन शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे स्तरावर “ऑपरेशन शोध” मोहिमेअंर्तगत विशेषतः हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये २१३ महिला, ९५ पुरुष, १० अपहृत मुले, १२ अपहृत मुली असे एकुण ३३० मिळुन आले आहेत. नवी मुंबईतील हरवलेल्या महिला व बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरीकांनी १०३ या हेल्पलाईन वर माहिती देण्याचे नवी मुंबई पोलीसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

जत, इस्लामपुरमध्ये सर्वाधिक तर शिराळ्यात सर्वात कमी प्रमाण

बेपत्ता, अपहरण दाखलचे प्रमाण जत आणि इस्लामपूर येथे सर्वाधिक आहे. जत पोलीस ठाण्यात १०५ आणि उमदी पोलीस ठाण्यात २९ मिसिंग दाखल आहेत. यापैकी जत पोलिसांनी १५ जणांना शोधले आहे तर उमदी पोलिसांनी अवघ्या चौघांचा शोध घेतला आहे. इस्लामपूर पोलिसांकडे ९५ महिला, आठ मुले आणि तीन मुली बेपत्ता झाल्याचे दाखल होते त्यातील ५४ महिलांना शोधण्यात यश आले आहे. शिराळा, कोकरूड आणि कुरळपमध्ये मिसिंगचे प्रमाण कमी आहे. तीन पोलीस ठाणे मिळून ३९ मिसिंग दाखल आहेत यातील ११ जणांना शोधण्यात यश आले आहे.

Satara Crime News: मोठी बातमी! सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस अॅक्शन मोडवर

Web Title: Operation search was successful in locating 330 individuals by the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
2

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
3

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.