
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Crime: घरातून बँकेत जातो म्हणत निघाला अन्… लोणावळ्याच्या लायन्स पॉइंट दरीत सापडला मृतदेह
काय घडलं नेमकं ?
मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव रोशनी रमेश गोस्वामी (वय १५) असे आहे. ती इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने ही शर्यत पूर्ण करत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धा संपल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. मात्र, काही वेळानंतर रोशनीला अस्वस्थ वाटू लागले.
तिला चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अश्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच शाळेतील शिक्षक व क्रीडा स्पर्धेचे आयोजकांनी तातडीने रोशनीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तिला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी रोशनीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या अकाली निधनाने उपस्थित सर्वानाच मोठा धक्का बसला.
रोशनीच्या जाण्याने वातावरण शोकाकुल
रोशनीच्या जाण्याने शाळेतील वातावरण शोकाकुल झाले आहे. अनेक विध्यार्थी आणि शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. मॅरेथॉनमध्ये धावल्यामुळे शरीरावर आलेल्या ताणामुळेच हा हृदयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय तपासणी व अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. रोशनीच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Crime News : मावळ तालुक्यात मोठी कारवाई; हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड
Ans: पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात.
Ans: विद्यार्थिनीचे नाव व वय काय?
Ans: मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आला.