Crime News : मावळ तालुक्यात मोठी कारवाई; हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड
काय घडलं नेमकं?
परेश सूर्यकांत हटकर (वय ३८, रा. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे) शुक्रवारपासून हा बेपत्ता होते. शुक्रवारी ते सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास बँकेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. हटकर हे बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते शुक्रवाईर घरी परतले नाही. याबाबत शनिवारी सकाळी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, हटकर यांची कार लायन्स पॉइंट येथील वाहनतळावर आढळून आली. तसेच तपासात त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशनही याच परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरु केली.
तेवहा त्यांचा मृतदेह लोणावळ्याजवळील लायन्स पॉइंट परिसरातील सुमारे ७०० फूट खोल दरीत आढळून आला. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने शनिवारी दुपारी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढलात्याच्या मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Ans: परेश सूर्यकांत हटकर, बँक ऑफ इंडियातील वरिष्ठ व्यवस्थापक.
Ans: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ सुमारे ७०० फूट खोल दरीत.
Ans: अद्याप स्पष्ट नाही; अपघात की घातपात याचा तपास सुरू आहे.






