नेमकं प्रकरण काय?
डायमेकर व्यावसायिक किशोर दवणे यांनी २ 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. त्यांनी सावकाराच्या जाचाला आणि अवाढव्य व्याजदराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. किशोर दवणे हे पालघरच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यांचे आत्महत्येमागचे कारण त्यांनी लिहलेली सुसाईड नोट मधून समोर आले.
सुसाईडनोट मध्ये काय?
मृतक किशोर दवणे यांनी डाय मेकिंगच्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज व्यवसायात आलेल्या मंदीमुळे तसेच भरमसाठ व्याजदर आणि सावकारी जाचामुळे, सततची शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिले.
तब्बल 4 महिने 25 दिवसानंतर गुन्हा दाखल
किशोर दवणे यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी तब्बल ४ महिने २५ दिवसानंतर 20 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्याने वानगाव पोलिसांच्या भूमिकेवर पीडित कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाणगाव पोलीस ठाण्यात मंगेश चूरी, तुषार साळसकर, इंद्रजीत गुप्ता , अरविंद पाटील उर्फ पिंटा आणि नितीन जैन अश्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी मंगेश चूरी आणि तुषार साळसकर यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील कारवाई पोलीस काय करतात हे बघणं महत्वाचं आहे.
आधारासाठी लपलेल्या महिलेवर चुलत सासऱ्यानेच केले अत्याचार; पालघरच्या मनोरमध्ये संतापजनक प्रकार
पालघरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आधारासाठी लपलेल्या महिलेवर चुलत सासऱ्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित महिला पतीपासून स्वतःचा बचाव करीत पालघर मनोरजवळील वारली हाट दालन प्रकल्पात लपून बसली होती. येथेच नराधमाने तिचा तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
Ans: अवैध सावकारीचा जाच, जास्त व्याजदर, सततची शिवीगाळ व धमक्या.
Ans: आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळाल्यानंतर तब्बल 4 महिने 25 दिवसांनी गुन्हा नोंदवला गेला.
Ans: पाच सावकारांविरोधात गुन्हा; दोघांना अटक, उर्वरितांचा तपास सुरू.






