crime (फोटो सौजन्य: social media )
पालघर : पालघरच्या नानिवली गावात चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न करतांना सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यात यश आले आहे. घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी सातही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मध्यरात्री झालेला हा दरोड्याचा प्रयत्न आणि घटनास्थळावरून पळ काढतानाचा घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्या आईकडून अमानवी छळ, चटके दिले, उपाशी ठेवलं……;
नेमकं काय घडलं?
पालघर तालुक्यातल्या नानिवली गावातील प्रसाद विजय पाटील यांच्या घरी चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. प्रसाद पाटील यांच्या घराचा दरवाजा लोखंडी
रॉडने तोडत असताना, त्यांच्या हातात चिकटपट्टी आणि पिस्तूल देखील होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधून चेहरा लपवला होता. याप्रसंगी घाबरून न जाता प्रसाद पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केला. आरडाओरडा केल्याने दरोडखोरांनी पळ काढला होता.
याघटनेचा संपूर्ण व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी प्रसाद पाटील यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गंभीर दखल घेत मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करून दरोडेखोरांना तातडीने अटक कारण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांच्या विशेष पथकाने घटनास्थळी पाहणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबरीच्या माहितीनुसार कासा वळवी पाडा येथून संदीप अशोक वळवी, तुषार गणेश रटाटे, ऋषिकेश भगवान गुरव (कुंज, विक्रमगड ), रामदास रमेश सालकर (देहरजे, विक्रमगड), प्रणय गंगाराम गावित (धामणी, विक्रमगड), अमोल अशोक वांगड (वाघाडी, डहाणू), भरत जयवंत मेढा (घाणेघर, विक्रमगड) या सात आरोपींना अटक केले. त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली इको कार ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींना पोलीस खाक्या दाखकवताच त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांना पालघर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केली असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
दम्यान, पुणे येथून लुटमारीच्या घटनांचा एक विचित्र प्रकार समोर आलं आहे. एका दिल्ली रहिवासी ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पुण्याच्या रेल्वे स्थानकापासून भिमाशंकरच्या घनदाट जंगलात नेहून रिक्षा चालकाने चाकूच्या धाकाने लुटल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या तपासातून ही बाब स्पष्ट झाली असून, रिक्षा चालक भीमाशंकर येथून निघून आल्याने ज्येष्ठाने हा बनाव रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, या बनावामुळे पोलिसांची यामुळे तारांबळ उडाली. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी रिक्षा चालकाला नोटीस देऊन सोडले आहे.