Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम; बेकायदेशीर इमारतींना अभय कोणाचं ?

बोईसरजवळील सरावली ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून सुरू असलेलयाचं निदर्शनास आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 12:41 PM
Palghar News : शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम; बेकायदेशीर इमारतींना अभय कोणाचं ?
Follow Us
Follow Us:
  • शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम
  • बेकायदेशीर इमारतींना अभय कोणाचं ?
पालघर / संतोष पाटील : बोईसरजवळील सरावली ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून सुरू असलेलयाचं निदर्शनास आलं. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. मौजे सरावली, नवापूर रस्त्यालगत ‘हॉटेल शबरी’ शेजारी असलेली सर्वे क्रमांक 104/1/A (क्षेत्र 2.24.00 हे.आर.) ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद आहे. या शासकीय जागेवर सोमदत्त पाठक, कृष्णा पाठक आणि शिवकुमार पाठक यांनी अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे समोर आले.

ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी ग्राम महसूल अधिकारी हेमंत मुलाने यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेले बांधकाम तत्काळ थांबवले. त्यानंतर या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पाठक बंधूंविरोधात एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासकी जमिनींवर अशाप्रकारे बेकायदी तीन मजली इमारत बांधताना कोणी पाठींबा दिला आणि कोणी सहकार्य केलं त्य़ा संबंधित या प्रकरणात सखोल चौकशी सुरु आहे.

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

बोईसर आणि तारापूर औद्योगिक परिसरात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे शहर नियोजनात अडथळे निर्माण होत आहे. या अनधिकृत बांधमकांमांवर चिंता व्यक्त केली जात असून हे असंच सुरु राहिलं तर बेकायदेशीर रित्या व्यवसाय़ करणाऱ्यांची हिंमत वाढेल. याबाबतच जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी गंभीर दखल घेत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले होते. दरम्यान, या अतिक्रमणाच्या बाजूलाच असलेले ‘हॉटेल शबरी’ हे देखील अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या हॉटेलबाबतही सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बोईसर परिसरात शासकीय जागांवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर वचक बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Palghar News : बोईसर-तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायू गळती ; दुर्घटनेत 15 ते 18 कामगार बाधित

Web Title: Palghar news unauthorized construction on government land encroachment on government land within saravali gram panchayat limits in boisar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • crime news
  • navrashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
1

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
3

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
4

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.