Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gauri garje-palve Case: ‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

रविवारी रात्री सुमारे १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अनंत गर्जे, त्यांचा भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 24, 2025 | 01:08 PM
Gauri garje-palve Case: ‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला
Follow Us
Close
Follow Us:
  • डॉ. गौरी गर्जे- पालवे यांची आत्महत्या
  • अनंत गर्जेला अटक
  •  अंत्यसंस्कारावेळी वडिलांना अश्रू अनावर
Pankaja Munde PA Wife Suicide in Mumbai: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे यांनी पती अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण गौरीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुबियांकडून केला जात आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी रात्री अनंत गर्जे याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी गौरीच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार करण्याचा आग्रही धरला होता. त्यावेळी गर्जे आणि पालवे कुटुंबियांमध्ये जोरदार वादही झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. पण त्यानंतरही गावात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला

गौरीच्या पार्थिवावर अत्यंसस्कार सुरू असताना गौरीच्या वडिलांना शोक अनावर झाला. त्यांनी हंबरडा फोडला. सर्वांदेखत ते धाय मोकलून रडू लागले. पोलिस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी विनवणी केली. ” तुम्हाला मुली द्यायच्या असतील तर आम्हाला द्या, तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंतांच्या भपक्यावर जाऊ नका, त्याच्या नादी लागू नका,” गौरीच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान, सुरुवातीला अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती नसल्याने गौरीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी गर्जेला अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, रविवारी रात्री सुमारे १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अनंत गर्जे, त्यांचा भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज अनंत गर्जे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांची पोलीस कोठडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान, काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक वरळीतील अनंत गर्जे यांच्या घरी रवाना झाले आहे. या पथकात डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश असून, झाडाझडतीदरम्यान कोणते महत्त्वाचे पुरावे सापडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

२ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. गौरी नायर हॉस्पिटलमध्ये डेंटीस्ट म्हणून कार्यरत होत्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अनंत गर्जे यांनी गौरीचा सातत्याने छळ केला. सप्टेंबरमध्ये घर शिफ्ट करताना गौरीला घरात अनंतच्या अफेअरशी संबंधित काही कागदपत्रे सापडली, ज्यामुळे तिला अनंतबद्दल संशय निर्माण झाला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, याच परिस्थितीमुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

 

Web Title: Pankaja munde pa wife suicide in mumbai father breaks down in grief while cremating gauri palaves body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • Mumbai crime news
  • Pankaja Munde
  • Sucide News

संबंधित बातम्या

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
1

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2

भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.