पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू (फोटो सौजन्य-ChatGPT)
तिखट-आंबट-गोड पाणी आणि रगडा असं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं. जेव्हा कधी जिभेचे चोचले पुरवावेसे वाटले, किंवा काही चमचमीत खावेसे वाटते तेव्हा डोळ्यासमोर पहिले नाव येते ते पाणीपुरीचे. पण याच पाणीपुरीमुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. पाटणा येथे एका हृदयद्रावक घटनेत एका व्यक्ती आणि त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चांदौस मेळ्यात पाणीपुरी खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे एकाच कुटुंबातील तीन जणांचा एकामागून एक मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि एका वडिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. तसेच कुटुंबात शोककळा पसरली आहे. पोलीस आता एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणाच्या पालीगंज उपविभागातील सिगोरी पोलीस स्टेशन हद्दीतील करहरा गावात तिघांची प्रकृती बिघडली. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर स्थानिक उपचारांचा प्रयत्न करण्यात आला. काही दिवसांनी एका मुलाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिघेही पालीगंजमधील चांदौस येथे एका जत्रेत फिरण्यासाठी गेले होते. यावेळी या जत्रेच पाणीपुरी खाल्ली. घरी परतल्यानंतर त्यांनी जेवण केले. रात्री उशिरा तिघांनाही अचानक पोटात दुखू लागले. त्यानंतर त्यांनची तब्येत बिघडली. ज्यामुळे त्यापैकी एकाचा घरीच मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी नीरज आणि निर्भय कुमार या दोन पुरूषांना तातडीने पालीगंज उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांना चांगल्या उपचारांसाठी पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले. आज सकाळी पीएमसीएचमध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
मृतांची ओळख नीरज साव अशी झाली आहे आणि मृत मुलांची नावे निर्मल कुमार (८) आणि निर्भय कुमार (४) अशी आहेत. तिघांच्या एकाच वेळी मृत्यूमुळे गावात मोठा संताप व्यक्त करण्यात आला. मृत्यू कसे झाले याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. याप्रकरणी घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, पाणीपुरीच्या पाण्यामुळे विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.