Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: बहीण भावाच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; कारण काय?

उत्तर प्रदेश मध्ये सख्ख्या भावाने विवाहित बहिणीची गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले. अपहरणाची खोटी कहाणी रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न; मोबाईल लोकेशनवरून सत्य समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 09:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सुरुवातीला अपहरणाची खोटी तक्रार
  • शॉलने गळा आवळून खून
  • मृतदेह झुडपात फेकला
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या विवाहित बहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने हत्या केल्यांनतर बहिणीच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र त्याने हत्या का केली? याचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

काय घडलं नेमकं

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उमाकांती असे आहे. तिचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला. तर आरोपीचं नाव अजय (२२) असे आहे. मंगळवारी उमाकांती हिच्या वडिलांनी अजयला ई-रिक्षा देऊन उमाकांतीला तिच्या सासरहून आणण्यासाठी पाठवले होते. मात्र तो बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एकाच घरी परतला आणि रडत सांगितले की, ‘काही अज्ञात तरुणांनी मला अमली पदार्थ देऊन उमाकांतीचे अपहरण केले आहे.’

तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तात्काळ धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिस अधीक्षक जे.पी. सिंह यांनी तपासाचे चक्रे फिरवली असता अजयने सांगितलेल्या घटनास्थळावर अपहरणाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. अजय आणि उमाकांती यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केल्यावर त्याचे लोकेशन त्याने सांगितलेल्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच मार्गावर आढळून आले. यामुळे पोलिसांना आजवर संशय बळावला. पोलिसांनी रात्री दीड वाजता अजयची कडक चौकशी केली. त्या पोलीस खाक्या दाखवताच त्याने बहिणीची हत्या केल्याचे कबूल केले.

हत्ये मागचं कारण काय?

‘बहीण घरातील किरकोळ गोष्टींवरून वाद घालायची आणि वडील तिचेच ऐकायचे. तिच्याच सांगण्यावरून वडिलांनी मला आठवड्यापूर्वी घराबाहेर काढले होते,’ असं कारण अजयने सांगितलं.

कशी केली हत्या?

जेव्हा अजय उमाकांती हिला घेऊन माहेरी परतत होता तेव्हा वाटेत पुन्हा त्याच्यात वाद झाला होता. आणि याच वादाने संतापून अजयने उमाकांतीच्याच शॉलने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील झुडपांमध्ये फेकून दिला. पोलिसांनी उमाकांतीचा मृतदेह,शॉल आणि ई-रिक्षा जप्त केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा वेगाने छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस अधीक्षकांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण?

    Ans: तिचाच सख्खा भाऊ अजय (२२).

  • Que: हत्या कशी उघडकीस आली?

    Ans: मोबाईल लोकेशन आणि कडक चौकशीतून सत्य समोर आले.

  • Que: हत्येचे कारण काय?

    Ans: घरगुती वादातून रागाच्या भरात हत्या केल्याचे आरोपीचे म्हणणे.

Web Title: Uttar pradesh crime a stain on the brother sister relationship the brother himself killed his sister what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime
  • uttarpradesh news

संबंधित बातम्या

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
1

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
2

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप
3

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या
4

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.