Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; पीडितेकडूनच दुचाकीसह सोने-चांदीचे दागिनेही नेले अन् क्रेडिट कार्डवरून…

फेब्रुवारी २०२४ मध्ये पीडितेची आरोपी देवराव देवसिंग साबळे याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळख वाढत गेल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2025 | 10:10 AM
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

Follow Us
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे; तर महिलेची ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करून आरोपी पसार झाला. फेब्रुवारी २०२४ मध्ये पीडितेची आरोपी देवराव देवसिंग साबळे (वय ३४, रा. धोणी, पालोदी, ता. मनोरा, जि. वाशिम) याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळख वाढत गेल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याला ६ लाख ५० हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने, क्रेडिट कार्डद्वारे ८० हजार रुपये आणि दुचाकी दिली.

हेदेखील वाचा : Mira Bhayandar Crime : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे क्रूर वास्तव

यानंतर आरोपी सर्व मालमत्ता घेऊन पसार झाला. त्याने पीडितेशी संपर्क तोडला. शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना २४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जून दरम्यान घडली. अखेर पीडितेने बुधवारी (दि. १३) अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी देवराव साबळेविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदरमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 12 वर्षीय मुलीचे तब्बल 200 हून अधिक नराधमांनी लचके तोडले आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. ती मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली होती. तीन महिन्यांच्या काळात तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

Web Title: Physical harassments of a woman on the pretext of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra news
  • Physical Harassments

संबंधित बातम्या

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
1

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
3

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
4

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.