Police arrest three people for threatening hotel owner with a knife in Shikrapur
शिक्रापूर : पुण्यामध्ये कोयता गॅंग वाढली असून पोलिसांनी अनेकांना दणका दिला आहे. शिरुर शहरात देखील अशीच एक कोयता गॅंगला जेरबंद करण्यात आले आहे. एका हॉटेल कामगाराला दुचाकीहून सोडण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. हॉटेल समोर जाऊन हॉटेल मॅनेजरला कोयता दाखवून मुंडके तोडण्याची धमकी या कोयता गॅंगने दिली. शिरुरमध्ये दहशत माजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले असून शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे.
शिरुर शहरातील पाबळ फाटा येथून शिवम हॉटेलचा हकिक खान हा दुचाकीहून जात असताना प्रदीप गायकवाड याने त्याला अडवून प्रीतमनगर येथे सोडण्यासाठी दबाव टाकला असताना हकिक हा घाबरून शिवम हॉटेलकडे गेला. त्यांनतर शहीद शेख, सोनू उर्फ अशपाक शेख व प्रदीप गायकवाड यांनी हॉटेल कोयता घेऊन येऊन शिवीगाळ, दमदाटी करत हॉटेल कामगारांना धमकी देत हॉटेल मॅनेजर पवन बिच्चेवार याला कोयत्याने मुंडके तोडण्याची धमकी दिली. याबाबत हॉटेल चालक सुरेश शंकराव भांगे (वय ६१ वर्ष), रा. गुरुकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर, शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिरुर पोल्सिंत फिर्याद दिल्याने पोलिसांनी शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड या तिघांवर भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हे दाखल केले होते.
त्यांनतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवलदार नाथसाहेब जगताप, सचिन भोई, नितेश थोरात, शेखर झाडबुके, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी शिरुर शहरातील रेणुका माता मंदीर परिसरात सापळा रचून शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड तिघे रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर ता शिरूर जि पुणे यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील कोयता जप्त करुन अटक केली सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कल्याणमध्ये किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला
कल्याण कडावमधील वडवली गावात पवार आणि मराडे कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या वाद उफाळून आला. गेल्या काही महिन्यांपासून विकास हरड आणि कैलास पवार यांच्यात एका रस्त्याच्या वापराबाबत मतभेद होते. कैलास पवार यांनी गावातील एका रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विकास हरड यांनी त्यांच्या घरासमोर कठडा बांधून तो रस्ता अडवला होता. हा वाद ग्रामपंचायतीपर्यंत गेला, पण तोडगा निघाला नाही. कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार यांनी विकास हरड यांच्या घरासमोर जाऊन कठडा तोडण्याची मागणी केली. यावरून वाद सुरू झाला आणि वैभव पवार यांनी लोखंडी रॉड व कोयत्याने विकास हरड आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यात विकास हरड आणि त्यांचा भाचा हितेश घुडे जखमी झाले.
कैलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्ट्राज गाडीतून येत मोठमोठ्याने शिवीगाळ केली. त्यांना शांत करण्यासाठी गेलेल्या मोहन मराडे, रोशन मराडे, प्रथम मराडे आणि हितेश घुडे यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रोशन मराडे यांच्या डाव्या हाताला, मोहन मराडे यांच्या डोक्याला आणि प्रथम मराडे यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.