Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Ganeshotsav 2026: नवी मुंबईतील कोपरखैरण्यात माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाने साताऱ्यातील प्रसिद्ध बावधन बगाड यात्रेची २० फूट प्रतिकृती साकारली आहे. तसेच मंडळाने पुढील पाच वर्षांसाठी ‘महाराष्ट्रातील पाच मोठ्या यात्रा’ अशी संकल्पना आखली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 02:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोपरखैरण्यात साकारली बावधन बगाड यात्रेची प्रतिकृती
  • दोन दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा झाला गणेशोत्सव
  • पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील पाच मोठ्या यात्रांची संकल्पना
Ganeshotsav 2026: गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. मुंबई आणि नवी मुंबईतील गणेशोत्सवात दरवर्षी विविध देखावे, सामाजिक संदेश देणारी सजावट आणि पारंपरिक संस्कृतीची झलक पाहायला मिळते. यंदाही अनेक गणेश मंडळांनी आगळ्या-वेगळ्या संकल्पना साकारल्या आहेत. अशाच एका अनोख्या संकल्पनेतून नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाने सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध बावधन बगाड यात्रेची २० फूट प्रतिकृती साकारली आहे.

दोन दिवस पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव

यंदा मंडळाने सातारा जिल्ह्यातील बावधन गावातील प्रसिद्ध बगाड यात्रा ही संकल्पना निवडली आहे. गणेश आगमनाच्या आदल्या दिवशी बावधनच्या शाही छबिना आणि पालखी सोहळ्याचे स्वरूप साकारण्यात आले. त्यानंतर आगमनाच्या दिवशी मंडळाच्या गणपतीची बगाडावर विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली.

या सोहळ्यात बावधन गावातील २० वादक मंडळी आणि मर्दानी खेळांचा समावेश करण्यात आला होता. दोन दिवसांचा हा संपूर्ण सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.

‘रील्स आणि फोटो पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव देता यावा’

बावधनची बगाड यात्रा प्रसिद्ध असली तरी प्रत्येकाला ती प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. त्यामुळे केवळ रील्स आणि फोटोच्या माध्यमातून ही यात्रा पाहण्याऐवजी ती आपल्या परिसरातील नागरिकांना अनुभवता यावी, या उद्देशाने मंडळाने ही संकल्पना साकारली आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा DJ किंवा बँजो न लावता पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. पारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळ आणि यात्रेची प्रतिकृती यामुळे परिसरात गणेशोत्सवाला वेगळं स्वरूप मिळालं आहे.

चाळीच्या कट्ट्यावर सुरू झालेला गणेशोत्सव

माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाची सुरुवातही एका छोट्या स्वप्नातून झाली. २०११ मध्ये चाळीच्या कट्ट्यावर बसलेल्या काही लहान मुलांनी गणेशोत्सव साजरा करण्याचं स्वप्न पाहिलं. त्यानंतर चाळीतील ऑफिसमध्ये गणेशमूर्तीची स्थापना करून या उत्सवाला सुरुवात झाली.

काळानुसार मुलं मोठी होत गेली आणि त्यांची जिद्दही वाढत गेली. याच जिद्दीमुळे कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चाळीचा हा छोटासा गणेशोत्सव आज संपूर्ण विभागात ओळखला जाऊ लागला आहे. मंडळाचा ‘गोड गणपती’ म्हणूनही या गणेशोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे.

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

१४ फुटांच्या गणपतीपासून २० फूट बगाडाच्या प्रतिकृतीपर्यंतचा प्रवास

२०२२ मध्ये मंडळाने पहिल्यांदा उभी गणेशमूर्ती आणली. त्यानंतर अरुंद चाळीतून १४ फूट उंचीच्या ‘गोड गणपती’चा प्रवास सुरू झाला. यंदा मात्र मंडळाने गणेशोत्सव पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेत सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध बावधन बगाड यात्रेची तब्बल २० फूट प्रतिकृती तयार केली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून या संकल्पनेवर काम सुरू होतं. मे महिन्यात बावधन गावातील मान्यवर आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा करून यात्रेचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर गावातील मंडळींच्या मदतीने बगाडाचा रथ आणि यात्रेशी संबंधित विविध गोष्टी हुबेहूब साकारण्यात आल्या.

पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील पाच मोठ्या यात्रांची संकल्पना

मंडळाने पुढील पाच वर्षांसाठी ‘महाराष्ट्रातील पाच मोठ्या यात्रा’ अशी संकल्पना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा बावधन बगाड यात्रेची निवड करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाबरोबरच माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाकडून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमही राबवले जातात. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांशी जोडण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

Web Title: Ganeshotsav 2026 koparkhairane bavdhan bagad yatra decoration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganesh Festival 2026
  • Ganeshotsav 2026
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
1

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.